Home /News /mumbai /

शिंदे गटाच्या नव्या दाव्याने आघाडीला मोठा धक्का? उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच होणार कारवाई?

शिंदे गटाच्या नव्या दाव्याने आघाडीला मोठा धक्का? उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच होणार कारवाई?

सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 34 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. तर आता यावर असा अधिकार उपाध्यक्षांना नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

    मुंबई, 24 जून : राज्यात सध्या काही काय होईल याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. आत्ता शिंदेविरोधात बोलणारे काही तासांनंतर त्यांच्यासोबत जात आहेत. त्यामुळे परिस्थिती खूपच मनोरंजक होत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)गटाचे 34 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 34 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली. पण, आता अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेचे अधिकारच नाहीत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यासंदर्भात दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहलं आहे. शिंदे समर्थक आमदारांवर कारवाई? एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 12 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र, आता हा आकडा आणखी वाढला आहे. आता यात आणखी 5 आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेकडून आणखी पाच जणांविरोधात अपात्रतेसाठी नावे देण्यात आली आहेत. सदा सरवणकर, संजय रायमुळकर, प्रकाश अबिटकर, बालाजी किणीकर, रमेश बोरनारे या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना बंडखोरांवर कारवाई करत एकूण संख्याबळ कमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. 'ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा'; मुख्यमंत्र्यांचं बंडखोरांना आव्हान उपाध्यक्षांना तो अधिकारच नाही? कारवाईच्या बातम्यांनंतर उपाध्यक्षांना तो अधिकारच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यासंदर्भात दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहलं आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी हे पत्र उपाध्यक्षांना दिलं आहे. एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात दाखल केला आहे. विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी 2016च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखल पत्रात दिला आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईस्तोवर त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत. एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यामुळे हा निर्णय आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde

    पुढील बातम्या