Home /News /mumbai /

EXCLUSIVE: राज्यातील सत्तानाट्य संपणार? 'या' तारखेला बंडखोर आमदार मुंबईत येणार, शिंदे म्हणाले..

EXCLUSIVE: राज्यातील सत्तानाट्य संपणार? 'या' तारखेला बंडखोर आमदार मुंबईत येणार, शिंदे म्हणाले..

Maharashtra Political Crisis: गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना 'आम्ही शिवसेनेत आहोत आणि लवकरच मुंबईत परतणार आहोत', असे सांगितले. त्याचबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 जून : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला (Maharashtra Politics Crisis) लवकरच पूर्णविराम मिळवण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटी येथे न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, 'आम्ही शिवसेनेत आहोत आणि कुठेही जाणार नाही. लवकरच मुंबईला परतणार आहे.'' लवकरच आपल्या पुढील वाटचालीबद्दल सर्वांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, 'जे लोक गुवाहाटीमध्ये उपस्थित असलेले 2 डझन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत, मग ते त्यांच्या नावांची यादी का जाहीर करत नाहीत?' शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, गुवाहाटीमध्ये उपस्थित असलेले सर्व आमदार आमच्यासोबत आनंदी आहेत. एकूण 50 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. लवकरच पुढील भूमिकेबाबत सर्वांना सांगेन आणि मुंबईला परतणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आम्ही शिवसेनेला पुढे घेऊन जाणार असून आम्ही शिवसेनेत आहोत, असे ते म्हणाले. सर्व आमदार गुवाहाटीला स्वखुशीने आले आहेत. केसरकर हे आमच्या गटाचे प्रवक्ते असून अधिक माहिती देणार आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही पुढे नेत असल्याचे बंडखोर नेते शिंदे यांनी सांगितले. आमदार 30 जूनला परतणार दरम्यान, सीएनएन न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, बंडखोर आमदार 30 जून रोजी मुंबईत परत येऊ शकतात. मुंबईत पोहोचल्यानंतर शिंदे राज्यपालांची भेट घेऊ शकतात, असे बोलले जात आहे. यानंतर फ्लोर टेस्टचीही मागणी करता येईल. खरे तर, शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या 38 सदस्यांनी सरकारला पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीचे सभागृहातील बहुमत कमी झाले आहे. Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं हॉटेलच्या गेटवर येऊन ओपन चॅलेंज, म्हणाले.. गुवाहाटीमध्ये शिंदे गट 21 जून रोजी शिंदे आणि मोठ्या संख्येने आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केले होते. सध्या ते आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. शिवसेनेने महाविकास (MVA) आघाडीतून माघार घ्यावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. फडणवीस दिल्लीत पोहोचले दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी एका वकिलासह दिल्लीला रवाना झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी सांगितले होते की, ते फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित होते, जिथे पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या