जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कोविड घोटाळा प्रकरणी IAS अधिकारी संजीव जयस्वालांना ईडीचा समन्स

कोविड घोटाळा प्रकरणी IAS अधिकारी संजीव जयस्वालांना ईडीचा समन्स

संजीव जयस्वाल

संजीव जयस्वाल

ईडीने IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना कोरोना जम्बो केंद्र कथित गैरव्यवहारप्रकणी समन्स बजावलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : ईडीने IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ED ने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. दोन बडे अधिकारी ED च्या रडारवर असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू आहे. ईडीने IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना कोरोना जम्बो केंद्र कथित गैरव्यवहारप्रकणी समन्स बजावलं आहे. संजीव जयस्वाल यांना आज चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं असून ते कार्यालयात पोहोचले आहेत. कोरोना जम्बो केंद्र कथित घोटाळा झाला त्यावेळी जयस्वाल महापालिकेमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदावर होते. त्यामुळे जयस्वालांना ईडीच्या बॅलार्ड इस्टेट कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलाय. IRS अधिकारी सचिन सावंत यांच्या यांची नुकतीच मनी लॉन्ड्रींग प्रकरणी चौकशी करण्यात आली. सचिन सावतं यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम एवढी मोठी आहे की अधिकाऱ्यांचंही डोक चक्रवून जाईल. सचिन सावंत यांची 2011 ला मालमत्ता होती 1 कोटी 4 लाख होती. तीच रक्कम आता वाढून 2022 ला 2 कोटी 1 लाख झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या या दोन अधिकाऱ्यांवर ईडीची बारीक नजर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात