Home /News /mumbai /

अबब! EDचा दणका, नीरव मोदी आणि चोकसीचा 1,350 कोटींचा खजिना हाँगकाँगहून आणला भारतात

अबब! EDचा दणका, नीरव मोदी आणि चोकसीचा 1,350 कोटींचा खजिना हाँगकाँगहून आणला भारतात

नीरव मोदीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आता नीरवच्या सर्व मालमत्तेवर भारत सरकारचा (Indian Government) अधिकार असणार आहे.

    मुंबई 10 जून:  बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून विदेशात पळालेल्या फरारी नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांना EDने मोठा दणका दिलाय. या दोघांचा खजिना आता EDच्या ताब्यात आला आहे. हिरे, माणिक, मोती, पाचू अशी 1,350 कोटींची बहुमूल्य रत्ने EDने हाँगकाँगहून भारतात आणली आहे. मोदी आणि चोकसीच्या फर्मचा हा खजिना असून 108 पेट्यांमध्ये तो भारतात आणण्यात आला आहे. या दोघांनाही भारतात आणण्यासाठी ED प्रयत्न करत असून त्यात मोठी प्रगतीही झाली आहे. हे दोघही पंजाब नॅशनल बँकेची 14 हजार कोटी बुडवून विदेशात पळाले आहेत. नीरव मोदी ला सोमवारी (8 जून) (Nirav Modi) ला कोर्टाने मोठा झटका दिला आहे. त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. नीरव मोदीवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालवला जात होता. त्यावर आज पीएमएलए कोर्टाने नीरव मोदीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता नीरवच्या सर्व मालमत्तेवर भारत सरकारचा (Indian Government) अधिकार असणार आहे. बड्या नेत्यांमुळेच उलटवलं काँग्रेस सरकार, शिवराजसिंहांची Audio Clip व्हायरल कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायदा (FEOA) नुसार सर्व मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोर्टानं फरार नीरव मोदीची संपत्तीदेखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती. यावेळी मार्च 2020 मध्ये झालेल्या त्याच्या मालमत्तीच्या लिलावातून 51 कोटी रुपये मिळाले होते. ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. ...तर पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च नीरव मोदीच्या लिलाव केलेल्या संपत्तीमध्ये रॉल्स रॉयस कार, एमएफ हुसेन आणि अमृता शेर-गिल यांची पेंटिंग्स आणि डिझाइनर हँडबॅग्जचा समावेश होता. यापूर्वी, सैफरनआर्टने मार्च 2019 मध्ये नीरव मोदीच्या मालकीच्या काही कलाकृतींचाही लिलाव करण्यात आला होता, त्यातून 55 कोटी रुपये मिळाले होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँक (PNB) ची 14,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी हा देशातून फरार असून सध्या लंडनच्या तुरूंगात आहे. संपादन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या