भोपाळ 10 जून: मध्यप्रदेशात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत राज्यातलं काँग्रेसचं कमलनाथ सरकार उलथवून टाकलं होतं. त्यानंतर काँग्रेसला मोठा हादरा बसला होता. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावर आता मोठा खुलासा झाला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यानेच सरकार उलटविण्यात आलं असं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं. त्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मध्यप्रदेशातल्या सत्ता पालटाशी भाजपचा काहीही संबंध नाही असं अमित शहा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सांगत होते. मात्र सिंह यांच्या या ऑडिओ क्लिपने त्यांचा तो दावा खोटा ठरवला आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यानेच हे ऑपरेशन यशस्वी ठरलं अशी माहिती आता पुढे आलीय. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकार राज्याला मोठ्या संकटात टाकेल. त्यांच्यापासून राज्याला वाचवणं आवश्यक आहे असं मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं. हे काम ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसी सिलावट यांच्या शिवाय झालंच नसतं. या दोघांनी धोका दिला असा काँग्रेसचा दावा आहे. मात्र धोका या नेत्यांनी नाही तर काँग्रेसनेच दिला अशी टीकाही शिवराजसिंह चौहान यांनी केली.
CM शिवराज का ऑडियो लीक!
— Mohammad Sami (@MohdSami777) June 10, 2020
इस वायरल ऑडियो क्लिप में म.प्र. के वर्तमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ये कहते हुये पाये गये कि मध्य प्रदेश में कांग्रेस सरकार को गिराने में केन्द्रीय नेतृत्व का हाथ है।
नोट- अभी तक किसी ने इस ऑडियो के सही होने की पुष्टि नहीं की है! pic.twitter.com/N1h71BzAuy
या क्लिप नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपनेच सत्ता हडपण्यासाठी हे काम केलं असं आम्ही कायम सांगत आलो असा आरोप काँग्रेस कायम करत आली आहे. त्यालाच या आरोपांमुळे पुष्टी मिळते असं काँग्रेसने म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची खातरजमा ‘न्यूज18 लोकमत’ने केलेली नाही. संपादन - अजय कौटिकवार