मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आपली मुंबई सुरक्षित नाही? जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक कितवा? एकदा बघाच

आपली मुंबई सुरक्षित नाही? जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक कितवा? एकदा बघाच

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) या दोन्ही शहरांना 60 शहरांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) या दोन्ही शहरांना 60 शहरांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) या दोन्ही शहरांना 60 शहरांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

डेन्मार्कच्या (Denmark) राजधानीचं शहर असलेल्या कोपनहेगनने (Copenhagen) जगातलं सर्वांत सुरक्षित शहर असल्याचा मान मिळवला आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने केलेल्या अभ्यासानंतर जगातल्या 60 सर्वांत सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात टॉप 10 सुरक्षित शहरांमध्ये भारतातल्या एकाही शहराचा समावेश नाही; मात्र देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) या दोन्ही शहरांना 60 शहरांच्या यादीत स्थान मिळालं आहे. दिल्ली 48व्या, तर मुंबईत 50व्या स्थानावर आहे. पाकिस्तानातल्या कराची या शहराला या यादीत शेवटून दुसरं म्हणजे 59वं स्थान मिळालं आहे. सीएनबीसी डॉट कॉमने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे (Economist Intelligence Unit) दर दोन वर्षांनी सेफ सिटीज इंडेक्स (Safe Cities Index) अर्थात सुरक्षित शहर निर्देशांक जाहीर केला जातो. या उपक्रमाचं यंदा चौथं पर्व आहे. यापूर्वी अव्वल ठरलेल्या टोकियो, सिंगापूर, ओसाका आदी शहरांना मागे टाकून या वेळी कोपनहेगनने यात बाजी मारली. शहरांच्या सुरक्षिततेचे पाच महत्त्वाचे स्तंभ असलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला होता. त्यात डिजिटल, आरोग्य, पायाभूत सुविधा, वैयक्तिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय सुरक्षितता या पाच मुद्द्यांचा समावेश होता. पर्यावरणीय सुरक्षितता हा मुद्दा या वेळी प्रथमच यात समाविष्ट करण्यात आला होता. तसंच, सुरक्षिततेच्या एकूण 76 संकेतांचा विचारही ही 60 शहरांची यादी निश्चित करताना करण्यात आला. जगभरातल्या शहरांच्या सुरक्षिततेचं चांगलं आणि जास्तीत जास्त वास्तववादी चित्र उभं करण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवण्यात आली.

कोपनहेगनला 100 पैकी 82.4 गुण मिळाले. 82.2 गुण मिळवून टोरांटो दुसऱ्या स्थानावर राहिलं, तर सिंगापूर, सिडनी आणि टोकियो या नेहमीच्या अव्वल शहरांनी याही वेळी पहिल्या पाचातलं आपलं स्थान टिकवलं.

जगातल्या सर्वांत सुरक्षित 10 शहरांची गुणानुक्रमे यादी अशी

1. कोपनहेगन

2. टोरांटो

3. सिंगापूर

4. सिडनी

5. टोकियो

6. अॅमस्टरडॅम

7. वेलिंग्टन

8. हाँग काँग

9. मेलबर्न

10. स्टॉकहोम

हे वाचा - कोब्राचा बदला! डोकं छाटून टाकल्यानंतरही 20 मिनिटांनी जिवंत झाला नाग; शेफला केला दंश; वाचून अंगावर येईल काटा

कोरोना विषाणूसंसर्गाच्या जागतिक साथीनंतर पर्यावरणाचं वाढलेलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या वर्षी पर्यावरणीय सुरक्षिततेचा मुद्दा त्यात समाविष्ट करण्यात आला होता. कोपनहेगन आणि टोरांटोने त्यात उत्तम कामगिरी केली. आरोग्य सुरक्षिततेबरोबरच कोरोना संसर्गाने सर्वच प्रकारच्या सुरक्षिततेवर मोठा परिणाम केला, असंही अहवालात म्हटलं आहे. सेफ सिटीज इंडेक्स प्रकल्पाच्या संचालिका प्रतिमा सिंग यांनी ही माहिती दिली.

काम, अर्थव्यवहार आदी गोष्टी कोरोना काळात ऑनलाइन स्वरूपात केल्या जाऊ लागल्यामुळे डिजिटल सिक्युरिटीला जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचंही सिंग यांनी सांगितलं. अशाच प्रकारे अन्य सुरक्षिततेवरही कोरोना कालखंडात बदल झाले.

श्रीमंत देशांमध्ये पायाभूत सुविधांवर चांगल्या प्रकारे खर्च केला जातो. आर्थिकदृष्ट्या मागास देशांनी मात्र पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे, असं या अहवालात सुचवण्यात आलं आहे. धोरणकर्ते आणि लागोस, कैरो, कॅराकास, कराची आणि यांगून या शहरांचा या यादीत सर्वांत शेवटचा क्रमांक लागला.

First published:

Tags: Delhi, Mumbai, Safety