मुंबई 05 नोव्हेंबर: सगळ्यात मोठा समजला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी (Diwali) आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाचं सावट या दिवाळीवर आहे. बाजारपेठा (Diwali Market ) सजायला सुरूवात झाली आहे. मात्र त्यात नेहमीसारखा उत्साह नाही. कोरोनाचा आलेख (Coronavirus) घसरणीला लागला असतानाचं दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीच उपाय म्हणून राजस्थान, ओडीसा, सिक्कीम या राज्यानंतर आता महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी (Ban on firecrackers on Diwali) घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
या आधी राजस्थान, ओरिसा, सिक्कीम या राज्यांनीही दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय घेतला होता.
कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे.
Online अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची दिवाळी होणार गोड
दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे.
दिवाळीआधी लखपती बनण्याची सुवर्णसंधी! 'ही' नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.
दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.