मुंबई

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

Online अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची दिवाळी होणार गोड, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Online अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची दिवाळी होणार गोड, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

दररोज घरात राहून तासंतास Online राहणारे मुलं आणि शिक्षक आता सर्वचजण कंटाळून गेले आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये सुट्टी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

  • Share this:

मुंबई 04 नोव्हेंबर: कोरोनामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष हे Onlineचं राहणार असल्याची शक्यता आहे. दररोज घरात राहून तासंतास Online राहणारे मुलं आणि शिक्षक (Students and Teachers) आता सर्वचजण कंटाळून गेले आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये सुट्टी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Edu Minister Varsha Gayakwad) यांनी त्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी (Diwali vacation) मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिलीय. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही गेली काही महिने अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.

शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांनी आज सांगितलं.

विमानात खेळत होती लपाछपी; फ्लाईट कर्मचाऱ्यांनी अशी अद्दल घडवली की...

अकरावी महाविद्यालय प्रवेश संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या बद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या