मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Sharad pawar health update : शस्त्रक्रिया यशस्वी, शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Sharad pawar health update : शस्त्रक्रिया यशस्वी, शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

 आजच्या या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही,

आजच्या या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही,

आजच्या या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

10 जानेवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांच्या डोळ्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे त्यांना आजच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. याआधी शरद पवार यांच्या एक डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानुसार आज दुसऱ्या डोळ्यावर आज शस्त्रक्रिया पार पडली.

(Shivsena Vs Shinde : सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला )

आज सकाळीच शरद पवार हे दहा वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर शरद पवार हे डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी बालाजी आयकेअर फोर्ट येथे गेले होते. यापूर्वी त्यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता दुसऱ्या डोळ्यावर करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार हॉस्पिटलमधून सिल्व्हर ओककडे रवाना झाले आहे.

आजच्या या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

(भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? मु्ख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बॅनरबाजी)

दरम्यान, मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर होते. त्यानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले होते. याआधीही मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.

First published:
top videos