जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शिंदेंची वकिली करताय, 110 कोटींमध्ये तुमचाही हिस्सा आहे का? राऊतांचा फडणवीसांना टोला

शिंदेंची वकिली करताय, 110 कोटींमध्ये तुमचाही हिस्सा आहे का? राऊतांचा फडणवीसांना टोला

 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा की नाही, मुळात सुप्रीम कोर्टानेच हे सरकार बाहेर काढावं, अनधिकृत हे सरकार आहे. बेकायदेशीरपणे शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा की नाही, मुळात सुप्रीम कोर्टानेच हे सरकार बाहेर काढावं, अनधिकृत हे सरकार आहे. बेकायदेशीरपणे शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा की नाही, मुळात सुप्रीम कोर्टानेच हे सरकार बाहेर काढावं, अनधिकृत हे सरकार आहे. बेकायदेशीरपणे शपथ घेतली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 डिसेंबर : नागपूर येथील भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा की नाही. पण हायकोर्टाने निर्णयाला स्थगिती दिली तरी नाक वरून करून बोलत आहात आणि उपमुख्यमंत्री हे वकिली करत आहे. यात तुमचाही वाटा आहे का? 110 कोटीमध्ये तुमचाही हिस्सा आहे का? यात मांजर आणि बोक्याची वाटणी आहे का?  भ्रष्टाचार झाला आहे. भूखंड वाटपामध्ये घोटाळा झाला आहे, याचे उत्तर द्या, अशी मागणी करण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुद्यावर संताप व्यक्त केला आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर झालेल्या भूखंड घोटाळ्याचा आरोपाबद्दलही टीका केली आहे. (winter session : ‘ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे एका पक्षाचा हात’, मुख्यमंत्र्यांचा मोठा आरोप) मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा की नाही, मुळात सुप्रीम कोर्टानेच हे सरकार बाहेर काढावं, अनधिकृत हे सरकार आहे. बेकायदेशीरपणे शपथ घेतली आहे. हायकोर्टाने निर्णयाला स्थगिती दिली तरी नाक वरून करून बोलत आहात. आणि उपमुख्यमंत्री हे वकिली करत आहे. यात तुमचाही वाटा आहे का? 110 कोटीमध्ये तुमचाही हिस्सा आहे का? यात मांजर आणि बोक्याची वाटणी आहे का?  भ्रष्टाचार झाला आहे. भूखंड वाटपामध्ये घोटाळा झाला आहे, याचे उत्तर द्या, अशी मागणीही राऊत यांनी केली. ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, महाराष्ट्राच्या जागांवर हक्क सोडणार नाही असा ठराव मांडला आहे. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची कधी झाली. सीमाप्रश्न जुना असला तरी ही भाषा योग्य नाही. अमित शहांसोबत बैठक झाली तरी हे बोम्मई उठतात आणि महाराष्ट्राच्या तोंडात मारता आणि आपले मुख्यमंत्री गाळ चोळत अधिवेशनाला जातात, असा सणसणीत टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला. ( ‘महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही’ कर्नाटकची नवी खेळी, म्हणे, ठराव आणणार! ) सीमाप्रश्न आजचा नाही, तुम्ही वारंवार सांगता बेळगावसाठी लाठ्या काठ्या खाल्यात असं सांगता, तर आता का गप्प आहात. आता जोर दाखवा, तुम्ही आता राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही सत्तेत आहात. मग फडणवीस असती किंवा शिंदे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री बसण्याच्या लायकीचे नाही. भूखंडाच्या मुद्यावर तासभर बोलायला तयार असता, पण कर्नाटकच्या मुद्यावर बोलायला तयार नाही, तुमच्या तोंडात कुणी बोळा कोंबला आहे का? संजय राऊत शिंदेंवर भडकले. ‘अमित शहा यांनी बोलावलं होतं, त्यावेळी गुंगीचे इंजेक्शन दिलं होतं, त्यावर न बोलण्याचं सांगितलं आहे का, असे असेल तर स्पष्ट करा. ग्रामपंचायतीमध्ये गावावर दावा करत आहात, आधी राज्यातील गावं चालली आहे ते पाहा. महाराष्ट्राचं सरकार घाबरलंय असं वाटतंय, यांना कुणाची तरी भीती वाटत आहे. तुम्ही भूमिका घ्या, आम्ही सगळे तुमच्या पाठिशी उभं राहू. पण हे भूमिकाच घेत नाही. कर्नाटकवर काहीच बोलत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात