मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शाळेत 15 टक्के फी कपातीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी, शिक्षणसम्राटांची आणले विघ्न!

शाळेत 15 टक्के फी कपातीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी, शिक्षणसम्राटांची आणले विघ्न!

'पण, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आपल्या निर्णयावर ठाम आहे. याबाबत काहीही झाले तरी उद्या अध्यादेश काढणारच...'

मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोना काळात शाळा बंद असतानाही पालकांनाकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यात आली. पण, राज्य सरकारने शिक्षण सम्राटांना याबद्दल दणका देत 15 टक्के फी कपातीचा (School Fees) निर्णय घेण्यात आला आहे. पण, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting ) या निर्णयावरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आज या निर्णयाबद्दल आदेश निघणे आवश्यक होते. पण  राज्यातील शाळांची फी 15 टक्के कमी करण्यासंदर्भात निर्णय झाला मात्र यावर अजूनही नोटिफिकेशन निघू शकलं नाही. हा निर्णय घेऊ नये याबाबत मंत्रिमंडळात खडाजंगी झाल्याचं समोर येत आहे. यासाठी शिक्षण सम्राट असलेल्या काहींनी विरोध केल्याची माहिती समोर येत आहे. 15 टक्के फी कपात करू नये, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली.

उंदरांनी कुरतडली प्रवाशाची बॅग, रेल्वेला 10 हजारांचा दंड, 8 वर्षांनी लागला निकाल

पण, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आपल्या निर्णयावर ठाम आहे.  याबाबत काहीही झाले तरी उद्या अध्यादेश काढणारच असं वर्षा गायकवाड ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने तिथली परिस्थिती देखील सुधारत आहे, अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरू कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला. त्यानंतर आता ग्रामीण आणि शहरी भागात 17 तारखेपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यापुढे Delta Plus चे संकट वाढले, मुंबईत 20 रुग्ण आढळले; राज्यात 65 रुग्ण

ग्रामीण भागात 5 ते 8 वी आणि  शहरी भागात 8 ते 12 वी शाळा सुरू केल्या जाणार आहे. सांगली सातारा, कोल्हापू , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, उस्मानाबाद पुणे, अहमदनगर यासारख्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळेत जर एखाद्या विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्यास आढळल्यास तात्काळ शाळा बंद करण्यात येणार आहे.

शाळा सुरू करताना कोविड नियंत्रण उपाय योजना करणे, विद्यार्थींना हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, शाळेच्या शिक्षकांनी लसीकरण पूर्ण करणे, शिक्षकांनी शाळा असलेल्या गावात राहावे, अथवा ये जा करण्यासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करू नये, असे नियमही घालून दिले आहे.

First published:

Tags: Varsha gaikwad