दिवाळीतल्या फटाकेबंदीवरून मंत्र्यांमध्ये मतभेद, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

दिवाळीतल्या फटाकेबंदीवरून मंत्र्यांमध्ये मतभेद, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटाके बंदी करावी ही आग्रही भूमिका घेतली. त्याच्या भूमिकेस काहीजणांनी हरकत घेतली.

  • Share this:

मुंबई 05 नोव्हेंबर: कोरोनाची लाट (Coronavirus wave) त्यात आलेली दिवाळी (Diwali) आणि थंडीची लागलेली चाहूल यामुळे राज्यात फटाक्यांवर बंदी (Ban on Diwali Firecrackers) आणावी अशी मागणी काही मंत्र्यांनी केली होती. मात्र यावरून मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात काही मंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालावी ही मागणी केली तर काहीनी त्यास हरकत घेत विरोध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटाके बंदी करावी ही आग्रही भूमिका घेतली. त्याच्या भूमिकेस काहीजणांनी हरकत घेतली. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. फटाके व्यावसायिकांनी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. अचानक असा निर्णय घेतला तर त्यांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली गेली. आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा फटाकेबंदी करावी या मताचे असल्याचे संकेत त्यांनीच दिले होते.

एकमत होत नसल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर नंतर चर्चा करू असं सांगत विषय थांबवला. आता मुख्यमंत्री संबंधित सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतली अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

दिवाळीसाठी 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत.

दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.

दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.

राज्यात ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेची शक्यता; आरोग्यमंत्री म्हणाले, काळजी घ्या!

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा

धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.

दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे

Published by: Ajay Kautikwar
First published: November 5, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading