राज्यात ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेची शक्यता; आरोग्यमंत्री म्हणाले, ‘दिवाळी’त काळजी घ्या!

Corona guidelines 'सुरक्षित दिवाळी साजरी केली तरच आपला आनंद टिकून राहिल आणि दुसऱ्यांचाही आनंद वाढेल त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नियमांचं कटाक्षाने पालन करा'

Corona guidelines 'सुरक्षित दिवाळी साजरी केली तरच आपला आनंद टिकून राहिल आणि दुसऱ्यांचाही आनंद वाढेल त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नियमांचं कटाक्षाने पालन करा'

  • Share this:
मुंबई 05 नोव्हेंबर: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) आलेख खाली येत असतानाच राज्य शासनाची चिंता दिवाळीमुळे (Diwali) वाढली आहे. या काळात लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही वाढेल त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थंडी वाढल्याने दुसऱ्या लाटेची (Coronavirus second wave) शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीसाठी सज्ज असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, कोविडची दुसरी लाट युरोपमध्ये आली आहे.थंडीचे दिवस हा विषय तर आहेच पण या काळात प्रदुषण वाढण्याचीही भीती आहे. त्याच सोबत दिवाळी असल्याने सर्व लोक बाहेर पडतात. गर्दी होते. लोक एकत्र येतात. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सरकारने सर्व तयारी केली आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. मात्र बिनधास्त राहून चालणार नाही हा धडा आपण घेतला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. सुरक्षित दिवाळी साजरी केली तरच आपला आनंद टिकून राहिल आणि दुसऱ्यांचाही आनंद वाढेल त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नियमांचं कटाक्षाने पालन करावं असं आवाहनही त्यांनी दिलं. दिवाळीसाठी 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत. दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी. दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा. दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे
Published by:Ajay Kautikwar
First published: