'राजे गेले, सेनापती गेले पण मावळे आमच्या सोबत'

'राजे गेले, सेनापती गेले पण मावळे आमच्या सोबत'

लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात लोकांनी भाजपला नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या तिकीटवर उदयनराजे भोसले निवडून आलेत. आता चार महिन्यानंतर ज्यांचा पराभव केला त्यांच भाजपमध्ये उदयनराजे जात आहेत.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 13 सप्टेंबर : राष्ट्रवादीतून एका पाठोपाठ एक नेत्यांच्या सोडून जाण्याने पक्षाला धक्के बसत आहेत. मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेही उद्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ते म्हणाले, राजे गेले, सेनापती गेले पण मावळे आमच्या सोबतच आहेत. या पडझडीतून पुन्हा पक्ष उभा करून विजय खेचून आणू असंही ते म्हणाले. ज्या पक्षाला जनतेने चार महिने आधी  नाकारले त्याच पक्षात उदयनराजे जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली. मुंडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात लोकांनी भाजपला नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या तिकीटवर उदयनराजे भोसले निवडून आलेत. आता चार महिन्यानंतर ज्यांचा पराभव केला त्यांच भाजपमध्ये उदयनराजे जात आहेत. उदयनराजे यांना पक्षाने पूर्ण अधिकार दिलेत असं कालच ठरलं होतं. त्यांनी काल काहीच सांगितलं नाही. अचानक आज निर्णय जाहीर केला.

राष्ट्रवादी सोडण्याआधी उदयनराजेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले...

भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जे आरोप केले होते ते कदाचीत ते विसरले असतील. कदाचित ठाकरे यांनी त्याचं उत्तर जाधव यांना दिले असेल असा उपोरोधिक टोलाही मुंडे यांनी जाधव यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेस जनतेचा विरोध आहे हेच दिसून येत आहे. लोक ठिकठिकाणी विरोध करतात महिलांनी काळे फुगे फेकले यातूनच विरोध दिसून येतो असंही ते म्हणाले. पोलीस बंदोबस्ताशिवाय महाजानदेश यात्रा सीएम यांनी काढून दाखवावी  माझे त्यांना चॅलेंज आहे असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्रीच तयार करणार शिवसेनेचीही 'यादी', उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने आश्चर्य

लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडविणाऱ्या राज ठाकरे यांची तोफ विधानसभा निवडणुकीत धडाडणार का? याबाबत सध्या संभ्रम निर्माण झालाय. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर आज नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक कुठल्याही निर्णयाविनाच संपली. विधानसभा निवडणुकीबाबात काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे लवकरच सांगतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झालीय. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती देताना सांगितलं की, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी आणि काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत. आता काय निर्णय घ्यायचा हे राज ठाकरे ठरवणार असून लवकरच ते आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 13, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या