राष्ट्रवादी सोडण्याआधी उदयनराजेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी सोडण्याआधी उदयनराजेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले...

'अपेक्षा आहे की आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,'

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : भाजप प्रवेशाबद्दल अखेर स्वत: खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृत घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 14 सप्टेंबर भाजपमध्ये प्रवेश करत आहे, अशी माहिती उदयनराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

'आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे की आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,' असं भावनिक ट्वीट करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत असल्याचं जाहीर केलं आहे.

उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यासाठी उदयनराजे संध्याकाळी दिल्लीत दाखल होतील. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला उदयनराजेंबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. खासदारकीचा आज राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

दरम्यान, भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विलंब झाला. मात्र आता उदयनराजे भाजपमध्ये जाण्यास तयार झाले आहेत.

VIDEO: 'आमच्या यात्रेत मैदान पुरत नाहीत आणि विरोधकांच्या...', मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 03:06 PM IST

ताज्या बातम्या