मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Devendra Fadnavis on Yuti: 'युतीमध्ये असताना श्वास कोंडत होता' देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Devendra Fadnavis on Yuti: 'युतीमध्ये असताना श्वास कोंडत होता' देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Devendra Fadnavis on Shiv Sena BJP Yuti: बरे झाले महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले यापूर्वी युती असल्यामुळे काही ठिकाणी भाजपाला पक्ष विस्तार करताना काही अडचणी येत होत्या अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट : शिवसेना (Shiv Sena) आणि भारतीय जनता पक्षांची (Bhartiya Janata Party) 25 वर्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वक्तव्य केलं होतं की, युतीत आमची 25 वर्षे सडली. त्यानंतर आता भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युतीत श्वास कोंडत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यात युती असताना अनेक ठिकाणी पक्ष विस्तार करताना काही अडचणी येत होत्या, श्वास कोंडत होता अशी कडवट टीका भाजपाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील पक्षाचे सरकार असल्याने भाजपला आता मोठी संधी आहे जशा आशा बुचके तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोना काळात मुंबईत 'मुन्नाभाई MBBS' चा सुळसुळाट; पोलिसांनी आवळल्या पाच बोगस डॉक्टरांच्या मुसक्या

2024 ला भाजपची स्वबळावर सत्ता येणार

आता तीन पक्ष एकत्र आले आहेत, पूर्वी युतीमुळे पक्ष वाढवण्यासाठी काही मर्यादा होत्या पण आता आम्ही मोकळा श्वास घेत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुका भाजपा स्वबळावर निवडणूक लढवेल आणि सत्तेत येईल असे वक्तव्य फडणीस यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या दीर्घकालीन काम करणाऱ्या आशा बुचके यांचा आज भाजपात मुंबई प्रवेश झाला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पक्षप्रवेश यादरम्यान फडणीस यांनी युती असताना पक्ष वाढवताना मर्यादा होत्या आता आमचा श्वास मोकळा आहे पक्ष आम्ही सर्वत्र वाढ असे वक्तव्य केले आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Shiv sena