जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / "माझं मुंबईत घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर..." राज्यसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

"माझं मुंबईत घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर..." राज्यसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

"माझं मुंबईत घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर..." निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

"माझं मुंबईत घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर..." निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

राज्यसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाकडून मुंबईत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धोबीपछाड दिला. त्यानंतर मुंबईतील भाजप (Mumbai BJP) कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यासोबतच शिवसेनेला एक सल्लाही दिला आहे. मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून कंगना राणौत, नारायण राणे, मोहित कंबोज, नवनीत राणा यांच्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड… मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाहीये. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल. नाहीतर मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरातील घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला नोटीस आलेली नाही. ही पद्धत योग्य नाही. केवळ सरकार चालवण्यासाठी, पदांसाठी सरकार चालवायचं. समाजातील एकाही घटकाचा विचार करायता नाही ही अवस्था आज पहायला मिळते ती अत्यंत खराब आहे. वाचा :  देवेंद्र भुयारांनी खरंच भाजपला मतदान केलं? राऊतांच्या आरोपांत किती तथ्य? स्वत: भुयार म्हणाले, “माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण…” देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला आपला विजय हा खरे आपले लढवयै आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण, शआरीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते इथं आले. माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि काही झालं तरी मतदान करणारच या भावनेतून त्यांनी मतदान केलं. त्यांच्यामुळे आपली तिसरी जागा व्यवस्थित निवडून आली. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहीचे चेहरे पडले आहेत. काही लोक तर बावचळले आहेत आणि काही पिसाटले आहेत. पण आपण जिंकलो आहोत. जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. जिंकलेल्यांनी जिंकल्याचा आनंद करायचा असतो उन्माद करायचा नसतो. वाचा :  निवडणुकीत कुठल्या आमदारांची मते मिळाली नाही? संजय राऊतांनी थेट आमदारांची नावेच केली जाहीर खरं म्हणजे जे लोकं सांगत आहेत की, हे कुणामुळे जिंकले, कुणामुळे जिंकले… त्यांना जर खऱंच माहिती असेल तर ते काहीही करणार नाही. याचं कराण असं की, त्यांचं सरकार टिकवणं त्यांना महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करायाल निघाले तर ते तर निघूनच जातील पण यांच्या प्रेशरने मदत करु शकले नाहीत पण मनाने आपल्या सोबत राहिले ते सुद्धा निघुन जातील. विधानपरिषदेची जागा आपण लढवत आहोत. तिथे सिक्रेट बॅलेट पद्धत आहे आणि त्या ठिकाणी सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन ते आपल्याला मतदान करतील. मला असं वाटतं की, या निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आम्ही जिंकलो ते हरले इथपर्यंत विषय समित नाहीये. पण महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. केवळ आमच्यासोबत लढायचं म्हणून आमच्या काळात सुरू झालेले सर्व प्रकल्प थांबवून महाराष्ट्राचं आतोनात नुकसान या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात