• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • अखेर मलिकांनी हायड्रोजन बॉम्ब फोडलाच; '14 कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी दाबल्याचा केला प्रयत्न' नवाब मलिकांचा गंभीर आरोप

अखेर मलिकांनी हायड्रोजन बॉम्ब फोडलाच; '14 कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी दाबल्याचा केला प्रयत्न' नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Nawab Malik on Devendra Fadnavis: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 10 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बनावट नोटांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठ-मोठ्या पदावर बसवलं. बनावट नोट प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला नवाब मलिकांनी म्हटलं, अत्यंत गंभीर आरोप करत आहे मी देवेंद्र फडणवीस तुमच्यावर, जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. वाचा : 'देवेंद्र फडणवीसांनी रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं' बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे. 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. मुंबईत एक पुण्यात एकाला अटक केली. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, 14 कोटी 56 लाख पकडले गेले आणि 8 लाख 80 हजार सांगत प्रकरण दाबलं गेलं असंही नवाब मलिकांनी म्हटलं. नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालवल्या जातात... या प्रकरणात गुन्हा दाखल होतो आणि त्यातील आरोपींना काही दिवसांत जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएला दिलं जात नाही. प्रकरणाचा तपास होत नाही. याचं कारण म्हणजे जे लोक हे रॅकेट चालवत होते त्यांना तात्कालीन सरकारचं संरक्षण होतं. असं सांगितलं गेलं की, पकडलेला काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेसच्या नेत्याला पकडलं गेलं नाही पण असं होतं की, पकडला गेला तर काँग्रेस नेत्यांवर बिल फाडा. बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं असंही नवाब मलिक म्हणाले. रियाज भाटी कोण? नवाब मलिकांचा सवाल नवाब मलिकांनी म्हटलं, मी देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला विचारु इच्छितो की, रियाज भाटी कोण आहे? 29 ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर बनावट पासपोर्टसह पकडण्यात आलं. त्याच्यावर दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. डबल पासपोर्टसह एखाध्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि दोन दिवसांत सुटला जाईल यामागे कोणता खेळ होता. रियाज भाटी तुमच्या सोबत सर्वच कार्यक्रमात का दिसत होता. रियाज भाटी भाजपच्या सर्व कार्यक्रमात कसा दिसत होता. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात रियाज भाटी कसा उपस्थित होता. पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला. गुंडांच्या मार्फत वसुलीचं काम देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सरकारी पदावर बसवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं. ठाण्यात पोलीस आयुक्त बसवत वसुलीचं काम केलं. विदेशातून गुंडाच्या मार्फत फोन करुन इकडे सेटलमेंट पोलीस करत होते आणि तुमच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकरण राज्यात सर्रास सुरू होतं असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत संबंध असलेला व्यक्ती पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पोहोचतो म्हणजे त्याला कुणाचा तरी आशीर्वाद होता त्यामुळेच तो कार्यक्रमात पोहोचला. दाऊद इब्राहिमचा खास आहे रियाज भाटी. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत रियाज भाटी याचे. आज तो फरार आहे. ठाण्यातून जेवढी वसुली होत होती त्याच्यातील तो एक प्रमुख व्यक्ती होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले बनावट नोटांचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन बनावट नोटा प्रकरणातील आरोपी इमरान हा हाजी अराफत याचा भाऊ तत्कालीन सरकारचा वरदहस्त असल्यानं प्रकरण दाबलं गेलं फडणवीसांकडून हाजी अराफत याला मंडळाचं अध्यक्षपद दिलं एनसीबीच्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत 14 वर्षांपासून एक अधिकारी मुंबईत मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी गुंड्डांना मोठ्या पदावर बसवलं हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाचं अध्यक्ष बनवलं
    Published by:Sunil Desale
    First published: