मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अधिवेशनात फडणवीस आक्रमक, गृहमंत्री अनिल देशमुखांवरच व्यक्त केला संशय, म्हणाले...

अधिवेशनात फडणवीस आक्रमक, गृहमंत्री अनिल देशमुखांवरच व्यक्त केला संशय, म्हणाले...

'हे सरकार खुनी आहे' असं म्हणत भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घातला

'हे सरकार खुनी आहे' असं म्हणत भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घातला

'हे सरकार खुनी आहे' असं म्हणत भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घातला

मुंबई, 09 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी(Mansukh Hiren death case) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (maharashtra budget session 2021) महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) तुफान राडा झाला आहे. सचिन वाझे (Sachin waze) यांना गृहमंत्री अनिल देशमुख पाठीशी घालत आहे, असा संशय देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी दाबली, असा पलटवार सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.

मनसुख हिरेन प्रकरणावर भाजप आमदारांनी अधिवेशनात जोरदार राडा घातला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर निवेदन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्यासमोर वाझे यांना निलंबित करण्याचं ठरलं होतं पण मग आता कोणावर दबाव आहे ? जर वाझे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला मग तो आता का जाहीर करत नाही, असं फडणवीस म्हणाले.

तसंच, एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वझे यांचा राजीनामा नाही. वाझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वाझेला निलंबित करा. कारवाई करणे नाही म्हणजे वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे आहे. वाझे यांना निलंबित करा, हा खरा चेहरा दिसतोय', असा आरोप फडणवीस यांनी केला.

SEBI नं बदलले PAN नंबर संदर्भातील नियम, 1 एप्रिलपासून लागू, वाचा काय होणार बदल

त्यानंतर सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक याच प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत आहे म्हणून भाजपच्या नेत्यांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते त्यांच्या निलंबनाची मागणी करत आहे, असा आरोप जाधव यांनी केली.

अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी करायची आहे आम्हाला” असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.  त्यानंतर 'अन्वय नाईक प्रकरणाची काय चौकशी करायची आहे ती खुशाल करा, असं आव्हानच फडणवीस यांनी दिले.

'मी सीडीआर मिळवला, खुशाल चौकशी करा'

'विरोधी पक्षाकडे सीडीआर कुठून आणलं, त्यांना काय अधिकार आहे, विरोधी पक्षनेत्यांना सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे का ? असा  सवाल नाना पटोले यांनी केला.

पंचविशीतल्या तरुणीपासून 94 वर्षांच्या आजींपर्यंत; 5 उद्योजिकांची प्रेरक यशोगाथा

'होय, मी सीडीआर मिळवला माझी चौकशी करा, पण जे खुनी आहेत त्यांची चौकशी करा. आम्हाला धमक्या देतायंत का? खुनी मिळाला नाही तर त्या पलीकडचीही माहिती काढेल', असं आव्हानच फडणवीस यांनी दिले.

हे सरकार खुनी आहे असं म्हणत भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले आणि त्यांनीही गोंधळ घातला.

First published:
top videos