मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पंचविशीतल्या तरुणीपासून 94 वर्षांच्या आजींपर्यंत; देशातल्या या 5 उद्योजिकांची गोष्ट देईल नवी प्रेरणा

पंचविशीतल्या तरुणीपासून 94 वर्षांच्या आजींपर्यंत; देशातल्या या 5 उद्योजिकांची गोष्ट देईल नवी प्रेरणा

बर्फीपासून हार्डवेअरपर्यंत... वेगवेगळ्या व्यवसायात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या पाच जणींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. करून दाखवायची जिद्द. वयाच्या 94 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हरभजन कौर यांच्याबद्दल वाचून तर तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल.

बर्फीपासून हार्डवेअरपर्यंत... वेगवेगळ्या व्यवसायात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या पाच जणींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. करून दाखवायची जिद्द. वयाच्या 94 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हरभजन कौर यांच्याबद्दल वाचून तर तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल.

बर्फीपासून हार्डवेअरपर्यंत... वेगवेगळ्या व्यवसायात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या पाच जणींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. करून दाखवायची जिद्द. वयाच्या 94 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हरभजन कौर यांच्याबद्दल वाचून तर तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 9 मार्च : आंतराराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women’s Day) स्त्रीशक्तीचा डंका वाजला. पण त्या एका दिवसापुरतं महिलांच्या कर्तृत्वाच्या गाथा गायच्या एवढ्या त्या खुज्या नाहीत.  फक्त स्त्रियांनाच नाही तर आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पाहणाऱ्या देशातल्या कुठल्याही तरुणाला प्रेरणा देतील अशा पाच जणींची यशोगाथा आम्ही सांगणार आहोत. कुठल्याही वयात आणि कुठल्याही पार्श्वभूमीवर व्यवसाय सुरू करता येतो. जिद्द, मेहनत, अभ्यास आणि चिकाटी याच्या जोरावर तो यशस्वीसुद्धा करता येतो हे या पाच जणींच्या उदाहरणावरून पटेल.

वयाच्या 94 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हरभजन कौर यांच्याबद्दल वाचून तर तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल.

दिव्या गोकुळनाथ : Byju's च्या सहसंस्थापक - दिव्या गोकुळनाथ (Divya Gokulnath)यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शिक्षिका म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. बायजू रवींद्रन यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांनी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देणारी बायज्युज (BYJU’S) ही आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देणारी नामवंत कंपनी उभी केली. आज या कंपनीची उलाढाल 12 अब्जांच्या घरात आहे. बंगळूरू इथं एका डॉक्टरच्या घरात जन्मलेल्या दिव्याला गणित आणि विज्ञानाची आवड होती. दिव्या आणि बायजू यांनी सुरू केलेल्या बायजूज -लर्निंग अॅपद्वारे सध्या सत्तर दशलक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

रोशनी नाडर : एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या प्रमुख : एचसीएल कार्पोरेशनच्या (HCL Corporation) पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या, कंपनीचे संस्थापक शिव नाडर (Shiv Nadar) यांच्या कन्या रोशनी नाडर यांनी 17 जुलै 2020 रोजी एचसीएल समूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचसीएल इन्फोसिस्टीम आणि एचसीएल हेल्थकेअर आदी कंपन्याचा समावेश एचसीएल उद्योगाची उलाढाल 8.9 बिलियन डॉलर्सची आहे. प्रख्यात केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतलेल्या रोशनी यांच्याकडे उद्योजकतेचा वारसा आपले वडील शिव नाडर यांच्याकडून आला आहे. वयाच्या 27 व्या वर्षी रोशनी यांनी एचसीएल कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती मिळाल्यानंतर 2013 मध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी आपले वडील शिव नाडर यांची जागा घेतली.

सोनाक्षी नाथानी : बिकायी (Bikayi) कंपनीच्या सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी -

बिकायी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना करणाऱ्या सोनाक्षी नाथानी (Sonakshi Nathani) या एक धोरणी आणि खंबीर महिला उद्योजिका आहेत. स्वतःला आलेल्या अनुभवातून त्यांनी या कंपनीची स्थापना केली आणि अवघ्या एका वर्षात ती नफ्यातही आणली. व्हॉटसअॅपच्या माध्यामातून स्थानिक दुकानदारांना एकत्र आणणारा हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. स्थानिक दुकानदारांना (local Vendors) शाश्वत उत्पन्नाची हमी बिकायी देते. जुलै 2020 मध्ये 25 हजार दुकानदार बिकायीशी जोडले गेले होते आता ही संख्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

अमृता सामंत : मॉमी शॉट्स-

भारतात गर्भवती महिला आणि बाळांच्या फोटोग्राफिचा पाया घातला तो अमृता सामंत (Amrita Samant) यांनी. मॉमी शॉट्स बाय अमृता’ (Mommy Shots By Amruta)या नावानं त्यांनी भारत आणि सिंगापूर इथं 2013 मध्ये या आगळ्या वेगळ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. नवजात बालकांचे आणि लहान बाळांची फोटोग्राफी ही त्यांची खासीयत. दहा देशांमध्ये 1400 पेक्षा अधिक फोटो शूट्स पूर्ण करणाऱ्या अमृता यांनी आपल्या या व्यवसायात सगळ्या महिला कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे.

वडिलांच्या आजारपणात उभा केला आयुर्वेदिक उत्पादन निर्मिती व्यवसाय; 'तिची कथा''

पोट्रेट फोटोग्राफर ते फॅमिली डॉक्युमेंटरी फोटोग्राफर असा प्रवास करणाऱ्या अमृता आयुष्यातील खरे क्षण टिपण्यावर भर देतात. त्या या फोटोग्राफीचा वापर स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अतीदक्षता विभागात असणाऱ्या नवजात बालकांना तसंच कर्करोगग्रस्त मुलांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी करतात. देशभरात त्या फोटोग्राफीच्या कार्यशाळा घेतात.

नवी कंपनी सुरू करताय? नोंदणीच्या नियमांत झाले आहेत महत्त्वाचे बदल

अभिनेत्री गुल पनाग, समीरा रेड्डी, क्रिकेटपटू सुरेश रैना, आर. अश्विन, रॉबिन उत्थप्पा, मुरली विजय, एल. बालाजी यांच्यासह अभिनेता अरुण विजय, दिग्दर्शक हरी, अभिनेता आर. मेनन, बॉबी सिम्हा अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्यांनी काम केलं आहे.

हरभजन कौर : हरभजन्स या स्टार्टअपच्या संस्थापक –

वयाच्या 90 व्या वर्षांनतर हरभजन कौर (Harbhajan Kaur) यांनी हरभजन्स (Harbhajan’s)नावानं एक स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्या सेंद्रीय बेसनाची बर्फी (Organic Besan Burfi) बनवतात आणि त्यांची मुलगी चंदीगडमधील सेंद्रीय बाजारपेठेत त्याची विक्री करते. महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनाही हरभजन कौर यांच्या या वयातील उमेदीनं भारावून टाकलं असून, त्यांनी यंदाच्या उद्योजिका असा किताब बहाल करत हरभजन कौर याचं कौतुक केलं आहे. हरभजन कौर यांच्या नातीनं ‘बचपन याद आजाए’ या टॅगलाइनसह या बेसन बर्फीचं ब्रॅडिंग आणि पॅकेजिंग केलं आहे. पाच वर्षाच्या प्रवासात हरभजन कौर यांनी 500 किलो बर्फी विकण्यापर्यंत झेप घेतली आहे. दर काही दिवसांनी त्या पाच ते दहा किलो बर्फी बनवतात.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, International women's day, Success stories, Women, Womens day