देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन, म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन, म्हणाले...

मुंडे नाराज असल्याने त्यांची नाराजी ही पक्षाला परवडणारी नाहीये. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.

  • Share this:

मुंबई 03 डिसेंबर : नाराज असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनधरणीचा प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टवरून आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली होती. मला तुमच्याशी बोलायचं आणि वेगळा मार्ग काय घ्यायचा याबद्दल निर्णय करायचा आहे असं पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहनही केलं होतं. त्यामुळे त्या दिवशी पंकजा मुंडे या मोठी घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्याने आधीच भाजपला धक्का बसलाय. त्यातच पंकजा मुंडे नाराज असल्याने त्यांची नाराजी ही पक्षाला परवडणारी नाहीये. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.

अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री? सरकारी हालचालींतून मिळाले संकेत

आपल्या पराभवाला पक्षातलेच नेते कारणीभूत आहेत असं मत पंकजा मुंडे यांचं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यांची नाराजी ही देवेंद्र फडणवीसांविरुद्ध असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे त्या बंडाचा झेंडा तर उभारणार नाहीत ना याबद्दलही अंदाज व्यक्त केले जात होते. त्यामुळे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा मुंडे यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती पुढे आलीय. त्या दोघांमध्ये विविध राजकीय विषयांवरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी?

दरम्यान, माजी मंत्री विनोद तावडे, बबणराव लोणीकर, राम शिंदे यांनी आज पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंकजाताईंची नाराजी दूर करण्यासाठीच ही भेट असल्याचं सांगितलं जातंय. मात्र पंकजा मुंडे यांनी अद्यापही या सगळ्या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन पंकजा मुंडे या शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 3, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading