मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'आता तुमच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे..' सभागृहात फडणवीस-खडसेंमध्ये कलगीतुरा

'आता तुमच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे..' सभागृहात फडणवीस-खडसेंमध्ये कलगीतुरा

सभागृहात फडणवीस-खडसेंमध्ये कलगीतुरा

सभागृहात फडणवीस-खडसेंमध्ये कलगीतुरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये सभागृहात कलगीतुरा पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर एकनाथ खडसे आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सभागृहात झालेला संवाद चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये सभागृहात कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे विषय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की तुम्ही त्या दिवशी माझ्या भाषणाच्या वेळेस उशीरा आलात, माझे तुमच्याकडे लक्ष होते. यावर एकनाथ खडसे म्हणाले म्हणजे माझ्याकडे लक्ष आहे तुमचे. तुमच्याकडे लक्ष आहेच पण आता गटनेते झालात त्यामुळे जास्त लक्ष दिले पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. या संवादानंतर राजकीय वर्तुळात याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

वाचा - ठरलं! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट, तारीखही सांगितली

फडणवीस : नाथाभाऊ तुम्ही राष्ट्रावादीमध्ये गेल्यापासून विदर्भाला विसरलात. कारण तुम्ही बोलले पाहिजे होते की समृद्धी महामार्ग चांगला आहे, ते बोलला नाहीत. महाराष्ट्र गीतावरुन तुम्ही बोललात दिल्लीचेही तख्त राखतो हे गाळले. तसं नाहीये ते कारण दिल्लीचे तख्त आमच्याकडेच आहे.

शशिकांत शिंदे - शुभेच्छा तुम्हाला

नाथाभाऊ - लवकरच जा

फडणवीस - हाहाहा

शशिकांत शिंदे : दोन वेळा बोलले ते त्यामुळे त्यांना तिथे जायचे आहे, म्हणुन सारखं बोलत आहेत.

फडणवीस : असं काहीही नाहीये. तुमचे स्वप्न पुर्ण होणार नाही. कारण मी इथेच असणारे. तुम्ही आम्ही इथेच असणार आणि पोजीशन पण हीच असणार.

फडणवीस : जाहीरातीवरुन बोलणे विरोधकांनी बंद केले पाहिजे. कारण इतर राज्य आता प्रगती करत आहेत ते मोठ मोठ्या जाहिराती देतायेत. मग त्यांना स्पर्धा म्हणुन जाहिराती दिल्या पाहिजे की नाही? सर्वात जास्त जाहिराती सामना वृत्तपत्राला दिल्या याची पोट दुखी आहे का तुम्हाला?

फडणवीस : आपल्या सरकारने किती पत्रकारांवर गुन्हे दाखल केले याची यादी फार मोठी आहे.

एकनाथ खडसेंच्या निवडीनंतर जळगावमध्ये जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल जळगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगाव च्या आकाशवाणी चौकात जल्लोष साजरा केला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष व एकनाथ खडसे यांच्या स्मरणार्थ घोषणा देत परिसर दणाणून टाकला होता.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Eknath khadse