विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला

विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला

आदित्य यांनी विरोधी पक्षावर कडाडून टीका केली. कोरोना हे राज्यावरच नाही तर जगावरील संकट आहे. जागतिक संकट समयी विरोधकांनी सरकारसोबत काम करणे अपेक्षित आहे.

  • Share this:

कल्याण, 11 जुलै:  कोरोनाचा पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजनमधील सर्व आयुक्तांची बैठक शनिवारी कल्याणमध्ये पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितत ही बैठक झाली.

नागरिकांनी फिट ठेवण्यावर सध्या आमचा भर असून विरोधीपक्ष मात्र इथल्या हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजममध्ये व्यस्त असल्याची घणाघाती टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एमएमआर रिजनमधील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

हेही वाचा... खळबळजनक! आत्मा मालिक ध्यानपीठ वसाहतीत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काम सुरू आहे याचा उहापोह आम्ही या बैठकीत केला. लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून फिट कसे ठेवता येईल याचे मुख्य आवाहन आहे. हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणारे धारावी मॉडेलचे किरण दिघावकरही या बैठकीला उपस्थित होते.

एमएमआर रिजनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडिकल इमर्जन्सी हे दोन महत्त्वाचे घटक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर याठिकाणी आम्ही जम्बो बेड्सची सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, अॅम्ब्युलन्स आदींची सुविधा वाढवत आहोत. मुंबईप्रमाणे इकडेही अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचाही विचार या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टूरिजम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा... चीनने कोरोनाची माहिती लपवली; हाँगकाँगच्या वायरोलॉजिस्टचा धक्कादायक खुलासा

राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापूरता मर्यादित नाहीये. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाबत माहितीचे व्यवस्थापन, त्याचे विश्लेषण आणि तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. शासन स्तरावरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑक्सिजन तपासणी यंत्रणा, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका आदी सर्वतोपरी मदत करत आहे. ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजनमधील महापालिकेने तपासण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने खाटांची क्षमता वाढवली आहे. यामुळे रुग्णांना कुठल्याही अडचणी निर्माण होत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एमएमआर रिजनमध्ये धारावी पॅटर्न राबवणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी य दाखला त्यांनी दिला.

Published by: Sandip Parolekar
First published: July 11, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या