Home /News /crime /

योगी बाबाचा हायप्रोफाइल फ्रॉड, ज्वेलर्सच्या पत्नीला 2 वर्षांपासून घालत होता असा गंडा

योगी बाबाचा हायप्रोफाइल फ्रॉड, ज्वेलर्सच्या पत्नीला 2 वर्षांपासून घालत होता असा गंडा

विशेष म्हणजे दोन वर्षे ज्वेलर्सला याबद्दल काहीच माहिती नव्हती.

    ऋषिकेश, 12 जुलै : उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या पत्नीला संमोहित करून बनावटी बाबाने लाखो रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बाबाच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर तब्बल 9 लाखांच्या सोन्या-चांदीचे दागिने सापडले. या बाबाची हायप्रोफाइल लोकांसोबत आणि राजकीय क्षेत्रातही ओळख आहे. (Yogi Babas High Profile Fraud) अनेकदा महिला, लहान मुलं किंवा आजारी व्यक्तींना पाहून अशा प्रकारची फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषत: महिलांनी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत शहानिशा करून घेतल्यानंतरही आर्थिक व्यवहार करावा. मिळालेल्या माहितीनुसार, गडवाल ज्वेलर्सचे संचालक हितेंद्र सिंह पवार यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. ज्वेलर्सने सांगितलं की, त्याची पत्नी मनोरुग्ण आहे. ज्याचा फायदा घेत योगी अनिमेशने व्यापाऱ्याच्या पत्नीची फसवणूक केली. हा योगी बाबा मानसिक आजारांवर अध्यात्मिक उपचाराच्या बहाण्याने अनेकदा महिलेला घरी बोलावून औषधांच्या माध्यमातून संमोहित करीत होता. 2019 पासून आतापर्यंत या बाबने एक रुद्राक्षाची माळा, सोन्याचं ब्रेसलेट, सोन्याचा हार, सोन्याच्या 4 अंगठ्या, तुळशीची माळ आणि काही कॅशही घेतली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-3 जणांची हत्या केल्यानंतर तरुणाची आत्महत्या; 2 दिवसात भावाचीही सापडली सुसाइड नोट तब्बल दोन वर्षांपासून योगी बाबा महिलेची फसवणूक करीत होता. जुलै महिन्यात ज्वेलर्सला हा धक्कादायक प्रकार कळला. यानंतर ज्वेलर्सने बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली. घटनेचं गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिसांनी बाबाच्या अटकेचा आदेश दिला. ज्याअंतर्गत सुरुवातील पोलिसांच्या टीमने बाबाची सर्व माहिती जमा करण्यात आली. सर्व तपासाअंती पोलिसांनी बाबाच्या घरी छापा टाकला. योगी बाबाच्या घरातून सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gold and silver, Money fraud

    पुढील बातम्या