मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पुन्हा हादरली; 6 वर्षीय चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचं घृणास्पद कृत्य

मुंबई पुन्हा हादरली; 6 वर्षीय चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचं घृणास्पद कृत्य

Minor Girl Rape in Mumbai: मुंबईच्या चारकोप परिसरात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत डिलिव्हरी बॉयनं घृणास्पद (delivery boy raped 6 years minor girl) कृत्य केलं आहे.

    मुंबई, 07 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात महिलाविरोधी होणाऱ्या अत्याचारांत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची अमानुष हत्या केली होती. ही घटना ताजी असताना बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. मुंबईच्या चारकोप परिसरात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत डिलिव्हरी बॉयनं घृणास्पद (delivery boy raped 6 years minor girl) कृत्य केलं आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी गुन्हा दाखल करताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत. टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी डिलिव्हरी बॉय चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीत पार्सल देण्यासाठी गेला होता. यावेळी याठिकाणी 6 वर्षीय पीडित मुलगी उभी होती. आरोपीनं तिला तिचा पत्ता विचारला आणि तिने सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन गेला. याठिकाणी कोण पाहत नसल्याची संधी साधत आरोपीनं पीडितेसोबत जबरदस्तीनं अत्याचार केला. हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी यानंतर नराधम आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या संतापजनक घटनेनंतर पीडित मुलगी वेदनेनं विव्हळत आपल्या आई वडिलांकडे गेली. तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. चिमुकल्या लेकीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच संतप्त कुटुंबीयांनी तातडीनं चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं बलात्कारसह पोक्सो कलमाअंतर्गत डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-चहासाठी बाप बनला राक्षस; चिमुकल्याला आधी भिंतीवर आपटलं मग छातीत मारला ठोसा याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांत आक्रोश आहे. या घटनेचा पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai, Rape on minor

    पुढील बातम्या