मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनावर नियंत्रण कसं मिळवायचं? देशाची राजधानी दिल्ली मुंबईकडून घेणार धडे

कोरोनावर नियंत्रण कसं मिळवायचं? देशाची राजधानी दिल्ली मुंबईकडून घेणार धडे

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई मॉडेल्सची (Mumbai model) अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं याआधी केंद्र सरकारनेही सांगितलं होतं.

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई मॉडेल्सची (Mumbai model) अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं याआधी केंद्र सरकारनेही सांगितलं होतं.

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई मॉडेल्सची (Mumbai model) अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं याआधी केंद्र सरकारनेही सांगितलं होतं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 09 जून : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेली मुंबई (Coronavirus in mumbai). कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वीरित्या थोपवलं आणि आता दुसऱ्या लाटेवरही नियंत्रण मिळवलं आहे. मुंबईने पुन्हा करून दाखवलं आहे. दरम्यान आता देशाची राजधानी दिल्ली देशाची आर्थिक राजधानी मुंबईकडून कोरोनावर नियंत्रण कसं मिळवायचं याचे धडे घेणार आहे. दिल्लीत कोरोनावर (Coronavirus in delhi) नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई मॉडेल (Corona mumbai model) राबवलं जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची प्रकरणं बरीच कमी झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून 08 जून, 2021 रोजी पहिल्यांदा सर्वाधिक कमी मृत्यू आणि सर्वाधिक कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. अवघ्या 105 दिवसांत मुंबईने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवून दाखवलं. मुंबई महापालिकेच्या 8 जूनच्या आकडेवारीनुसार 24 तासांत 673 रुग्ण सापडले आहेत, तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून पहिल्यांदाच एक आकडी मृत्यूची नोंद (Corona death in mumbai) आणि सर्वाधिक कमी नवे रुग्ण नोंदवले (Corona new cases in mumbai) गेले आहेत, असं बीएमसीने सांगितलं.

आता दिल्ली सरकारचं एक पथक मुंबईत येणार आहे. कोरोनावर नियंत्रण कसं मिळवायचं याचा अभ्यास करणार आहे. मुंबईत बीएमसीमार्फत तयार करण्यात आलेले वॉर्ड वॉर रूम यासारख्या इतर अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची पाहणी करणार आहे आणि तशाच पद्धतीने दिल्लीतही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मोदी सरकारनेही केलं होतं मुंबई मॉडेलचं कौतुक

मुंबई कोरोनाशी ज्या पद्धतीने लढा देत आहे, त्याची केंद्रानेही दखल घेतली होती. अगदी मोदी सरकारनेही मुंबई मॉडेलचं कौतुक केलं होतं. मे महिन्यात कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा मुंबईचा प्रामुख्याने उल्लेख केला होता. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.

हे वाचा - मुंबईने करून दाखवलं! 105 दिवसांनंतर पहिल्यांदाच मिळाला मोठा दिलासा

केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं, "कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज आहे. नागरिकांना संपर्क साधता यावा, त्यांच्या अडचणी सांगता याव्यात, यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते, मात्र ते महापालिका पातळीवर नाही तर वॉर्ड पातळीवर तयार करण्यात आले होते. 24 वॉर्डासाठी प्रत्येकी एक असे 24 नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडे जे रुग्णचाचणीचे रिझल्ट येत, ते संबंधित वॉर्डातल्या नियंत्रण कक्षात पाठवले जात. हे कक्ष केंद्र म्हणून काम करत आणि त्यानुसार प्रत्येक वॉर्डात रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देण्यात आला"

लव अग्रवाल पुढे म्हणाले, "प्रत्येक वॉर्डरूम मध्ये 30 दूरध्वनी लाईन्स होत्या, त्या सांभाळण्यासाठी 10 फोन ऑपरेटर्स, 10 डॉक्टर्स आणि 10 रुग्णवाहिका होत्या. तसंच, खाटांची उपलब्धता सांगणारे 10 डॅशबोर्डदेखील या कक्षांमध्ये लावण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांना काहीही त्रास झाला नाही"

हे वाचा - अमेरिकेनंतर भारताकडूनही चीनची पोलखोल; तज्ज्ञाने कोरोनाबाबत दिला मोठा पुरावा

"याशिवाय, 800 SUV गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिका म्हणून रुपांतरीत करण्यात आल्या होता. या सर्व रुग्णवाहिकांचा माग काढत त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक  सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आला.  या सर्व व्यवस्था समन्वय राखून योग्यप्रकारे काम करत होत्या, जेणेकरुन रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये.", असं सांगत अग्रवाल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या या योजनाबद्ध प्रयत्नांचं कौतुक केलं.

First published:

Tags: Coronavirus, Delhi, Mumbai