नवी दिल्ली, 09 जून: कोरोनाव्हायरस (Coronavirus) कुठून आला हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण आतापर्यंत चीनच्याच (China) दिशेने अनेक संकेत मिळत आहेत. अमेरिकाही चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला या आपल्या दाव्यावर ठाम आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा याबाबतचा ई-मेल काही दिवसांपूर्वीच समोर आला आणि त्यानंतर या चर्चेला पुन्हा उधाण आला. याचदरम्यान आता भारतातील एका व्हायरोलॉजिस्टने चीनला कोरोना महासाथीबाबत (Coronavirus Pandemic) आधीपासूनच माहिती होतं, असा दावा करत पुरावाही दिला आहे.
वेल्लूरमधील क्रिश्चचियन मेडिकल कॉलेजमधील क्लिनिकिल व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख आणि माजी प्राध्यापक डॉक्टर टी जॅकब जॉन यांनी वुहान लॅबमधून कोरोनाव्हायरस लीक होण्याप्रकरणी काही दावे केले आहेत.
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार डॉ. जॉन म्हणाले, चीनमध्ये याप्रकरणी काही रहस्य आहेत. चीनमधील कोरोना महासाथ जगापेक्षा वेगळी होती. याचा अर्थ चीन काहीतरी लपवतं आहे. एकतर ते वेगळे आहेत किंवा चीन आधीपासूनच तयारी करत होता. जसं दिसतं आहे, तसं नाही.
हे वाचा - कोरोना रुग्णांच्या नखांमध्ये होतोय बदल; तुमच्यामध्येही असं लक्षण तर नाही ना?
जॉन यांनी चीनच्या लसीकरण प्रक्रियेचाही हवाला दिला आहे. त्यांनी चिनी शास्त्रज्ञांचा उल्लेखही केला आहे, ज्यांनी 24 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजे महासाथ सुरू झाल्यानंतर फक्त दोन महिन्यांनीच कोरोना लशीच्या लायनेन्ससाठी अर्ज केला होता. जॉन म्हणाले, फक्त दोन महिन्यांत लशीवर काम हे खूप जलद आहे. त्यांनी नक्कीच कमीत कमी एक वर्षाआधी काम सुरू केलं असेल. त्या तरुणाचा आता मृत्यू झाला आहे. एखादा गुन्हेगार काहीतरी लपवतो, तसं चीन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं वाटतं आहे.
हे वाचा - खासगी रुग्णालयात Corona vaccine घेणार आहात; इथं पाहा कोरोना लशीचे नवे दर
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाव्हायरसची 91 हजार 316 प्रकरणं समोर आली आहे. त्यापैकी 4 हजार 636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 86 हजार 267 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 413 रुग्णांवर उपचार सुरू आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये जगातील कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आहेत. या तिन्ही देशांतील एकूण कोरोना रुग्णंची संख्या कोट्यवधीपर्यंत पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona, Coronavirus, Covid-19