BREAKING: मठाधिपतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

BREAKING: मठाधिपतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतिनाथ महाराजांचा खून झाला.

  • Share this:

नांदेड, 24 मे:पालघर येथील दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेड जिल्ह्यात एका मठाधिपतीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. याशिवाय मठात त्यांच्या एका सेवेकरीचीही हत्या करण्यात आली आहे. मठातील शौचालयाजवळ एक मृतदेह सापडला आहे.

हेही वाचा.. भाजपविरुद्ध भाजप! खासदार पुत्रांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागठाणा गावातील एका माथेफिरू तरुणाने महाराजांची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. नंतर महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. एवढंच नाही तर महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न केला. महाराजांचा मृतदेहही पळवून नेण्याचा त्याचा इरादा होता. मात्र मठाशेजारी राहाणारे लोक जागे झाल्याचं पाहताच आरोपीने गाडी तिथेच सोडून पळ काढला. गाडीत बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा मृतदेह आढळून आला. शिवाचार्य महाराज हे मूळ कर्नाटकातील रहिवाशी होते.

नागठाणा मठात आणखी एक मृतदेह..

नागठाणा मठातील शौचालयात आणखी एक मृतदेह आढळला आहे. चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा हा मृतदेह आहे. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भगवान शिंदे हा आरोपी सोबत होता की मठातील सेवेकरी होता, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

हेही वाचा.. श्रीदेवीमुळे अनिल आणि बोनी यांच्यात झालं होतं जोरदार भांडण, वाचा नेमकं काय घडलं

महाराज आणि भगवान शिंदे यांचा मतृदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा भाविकांनी घेतला आहे.

महाराजांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला की आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे उमरी तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.

First published: May 24, 2020, 9:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading