जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुलगी रेवतीने पगारातून सुप्रिया सुळेंना वाढदिवसाचे दिले Special Gift

मुलगी रेवतीने पगारातून सुप्रिया सुळेंना वाढदिवसाचे दिले Special Gift

मुलगी रेवतीने पगारातून सुप्रिया सुळेंना वाढदिवसाचे दिले Special Gift

Special Gift to Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस 30 जून रोजी होता. त्यांच्या वाढदिवसाला मुलगी रेवतीने त्यांना खास गिफ्ट दिले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जुलै: राजकीय नेत्यांचा वाढदिवस (Politician birthday) म्हटलं की मोठमोठे बॅनर, कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी पहायला मिळते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व नेते आपला वाढदिवस साधेपणात आणि घरातच साजरा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांचा 30 जून रोजी वाढदिवस होता. त्यांनीही आपल्या घरीच वाढदिवस साधेपणाने साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांना राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. मात्र, हा दिवस त्यांच्यासाठी खास ठरला तो त्यांच्या मुलीने दिलेल्या एका खास गिफ्टमुळे. होय, कारण मुलगी रेवती (Daughter Revati) हिने सुप्रिया सुळे यांना एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट पाहून स्वत: सुप्रिया सुळे सुद्धा भावुक झाल्या आणि त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियात व्यक्त केल्या.

जाहिरात

मुलगी रेवती (Daughter Revati) हिने आपल्या पगारातील पैशांतून सुप्रिया सुळे यांच्यासाठी केक आणला. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं, हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… काल परवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडिलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच णोठं वाटतं. ‘मी पुन्हा येईन…’ म्हणणाऱ्या देवेंद्र यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? स्वत: फडणवीसांनी दिलं हे उत्तर

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुप्रिया सुळे यांनी घरातच साधेपणाने वाढदिवस साजरा केला त्याचे फोटोज शेअर केले आहेत. इतकेच नाही तर वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानणारी एक पोस्टही त्यांनी केली आहे.

जाहिरात

आपल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाबद्दल आपले मनापासून आभार. यावर्षी कोरोनाच्या भीषण संकटात आपण आपली अनेक जीवाभावाची माणसं गमावली. त्या सर्वांची आज आठवण येतेय. त्यांचे स्मरण करतानाच आपण केलेल्या अभिष्टचिंतनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात