राजस्थानमध्ये मुस्लिम गावांना दिली हिंदू नावं

राजस्थानमध्ये मुस्लिम गावांना दिली हिंदू नावं

  • Share this:

राजस्थान, 09 आॅगस्ट : राजस्थान सरकारकडून तिथल्या दोन गावांची नावं बदलण्यात आली आहेत. आधी या दोन्ही गावांचा नावं ही मुस्लिम होती, पण आता त्यांची ती नावं बदलून हिंदू नावं ठेवण्यात आली आहेत. झुंझनू के इस्माईलपुर याचे नाव पिचानवा खुर्द केले आहे आणि बाडमेर जिल्ह्यातील मियों का बाडा याचे नाव महेशनगर करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे 27 गावांची नावं बदलण्याची परवानगी मागितली होती. यामध्ये 27 गावांपैकी 8 गावांची नावं बदलण्याची परवानगी मिळाली होती. या 8 गावांमध्ये जास्त मुस्लिम नावं होती जी आता बदलण्यात आली आहेत. ही 8 गावं 1 ऑगस्टपासून बदललेल्या नवीन नावांनी ओळखली जातील.

मिळालेल्या माहिती नुसार, गावकऱ्यांनी ही मुस्लिम नावं बदलण्याच्या तक्रारी दिल्या होत्या. पाकिस्तानच्या सीमेजवळ ‘मियों का बाडा’ या मुस्लिम नावाचे एक गाव आहे. या गावाची एकूण संख्या 2000 इतकी आहे. गावात फक्त 4 मुस्लिम कुटुंब राहतात आणि बाकीचे सगळे हिंदू आहेत. त्यामुळे या गावाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली.

एका गावकऱ्याचे म्हणणे आहे की या मुस्लिम नावांमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. स्थानिक मुलांच्या लग्नासाठी स्थळं येत नाहीत अशा अनेक समस्या यावेळी त्यांनी सांगितल्या.

First published: August 9, 2018, 10:28 PM IST

ताज्या बातम्या