Unlockनंतर राज्यात धोकादायक वाढ, आज सापडले सगळ्यात जास्त 3607 रुग्ण; आकडा लाखाच्या जवळ

Unlockनंतर राज्यात धोकादायक वाढ, आज सापडले सगळ्यात जास्त 3607 रुग्ण; आकडा लाखाच्या जवळ

आज 152 नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 3590वर गेला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 46078 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 11 जून:  राज्यात लॉकडाऊन नंतर रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत आहे. आज राज्यात 3607 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे  एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 648 म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर आज  152 नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 3590वर गेला आहे. आज 1561 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात 46078 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज झालेली रुग्णांची वाढ ही आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ आहे.

मुंबईत 97 तर मीरा भाईंदर मध्ये 9 मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात आज दिवसभरात 268 जणांना कोरोनाची लागण झाली तर 7 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव

रुग्ण ज्या घरात सापडले आहेत त्या घरांना एपिसेन्टर मानत तिथला संसर्ग दुसरीकडे पसरू नये म्हणून त्या घरांना आणि भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलं जातं. आणि काही काळापुरती ती घरं किंवा भाग सील केले जातात. म्हणजेच तिथून कुणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरून आत येण्यास लोकांना मज्जाव असतो.

हे वाचा - बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात

सध्या मुंबईमध्ये अशी 11 लाख 30 हजार 765 इतकी घरं आहेत. त्यापैकी झोपडपट्टीतील 9 लाख 50 हजार 578 तर इमारतींमधील 1 लाख 80 हजार 187 इतकी घर सील करण्यात आली आहेत. आणि मुंबईतील जवळपास अर्धा कोटी लोकांना सध्या घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. या सील केलेल्या या घरांमध्ये राहणारी एकूण लोकसंख्या ही 50 लाख 20 हजार 538 इतकी येते याचा अर्थ असा की पन्नास लाखाहून अधिक लोकांना सध्या तरी कुठे ये जा करतां येणार नाही.

24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. यासह कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. तर, दुसरीकडे आत मृतांचा आकड्यात सर्वात जास्त वाढ झाली. गेल्या 24 तासांत तब्बल 357 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्यावर गेला आहे. ही चिंतेची बाब असली तरी एक दिलासादायक बातमीही आली आहे.

हे वाचा - कोरोना विषाणूचं संशोधन माझ्या बॉडीवर करा, पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याची मागणी

भारतात आज सगळ्यात जास्त म्हणजे 357 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह भारतातील मृतांचा आकडा 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून रोज 9000 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र असे असले तरी निरोगी रुग्णांची संख्या देशात वाढत आहे.

First published: June 11, 2020, 8:33 PM IST

ताज्या बातम्या