मुंबई, 25 मार्च : महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाव्हायरसचे आणखी 6 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात राज्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 15 रुग्ण आढळून आलेत. सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं.
राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. 'जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
#21दिवस : शहरं लॉकडाउन; गावांचं काय? 'इथे परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा
'कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 10 बळी घेतला आहे.
Coronavirus मुळे इटलीत अडकली भारतीय गायिका, व्हिडीओ शेअर करुन सांगितलं दुःख
कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यांवरून विना आयडी फिरणाऱ्यांवर आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. देशात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.