जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Coronavirus मुळे इटलीत अडकली भारतीय गायिका, व्हिडीओ शेअर करुन सांगितलं दुःख

Coronavirus मुळे इटलीत अडकली भारतीय गायिका, व्हिडीओ शेअर करुन सांगितलं दुःख

Coronavirus मुळे इटलीत अडकली भारतीय गायिका, व्हिडीओ शेअर करुन सांगितलं दुःख

गायिका श्वेता पंडीत मागच्या एका महिन्यापासून इटलीत अडकली आहे. व्हिडीओ शेअर करत तिनं तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. ज्यामुळे सर्वकाही ठप्प झालेलं दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या सिनेमांची शूटिंग थांबवून घरी राहणंच पसंत केलं आहे. चीन नंतर या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला तो इटलीला. या देशात हजारो लोक या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. याच देशात भारतीय गायिका श्वेता पंडीत मागच्या एका महिन्यापासून अडकली आहे. तिनं तिच्या सोशल मीडिया एक व्हिडीओ शेअर करत तिथे नेमकी काय परिस्थिती आहेत हे सांगितलं आहे. श्वेता पंडित मागच्या एक महिन्यापासून इटलीमध्ये अडकली आहे. मागच्या एक महिन्यापासून ती तिच्या रुममधून बाहेर पडलेली नाही. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून भारतात राहत असलेल्या आपल्या आई-बाबांना खूप मिस करत असल्याच सांगितलं आहे. श्वेतानं पीएम मोदींच्या लॉकडाऊनच्या घोषणेचंही समर्थन केलं आहे. ‘शमितामुळे मला नेहमीच असुरक्षित वाटत असे’, शिल्पाचा धक्कादायक खुलासा

जाहिरात

या व्हिडीओमध्ये श्वेता सांगते, मागच्या काही आठवड्यांपासून मी कोरोना व्हायरस बद्दल ऐकत आहे. या व्हायसरनं सगळीकडेच थैमान घातलं आहे. भारतातही सध्या 21 दिवसांचं लॉकडाऊन आहे. मला मोदीजींच्या या निर्णयानं खूप आनंद झाला. चीननंतर ज्या देशाला या व्हायरसची झळ बसली आहे अशा देशात मी सध्या अडकले आहे. मागच्या 1 महिन्यापासून मी माझ्या रुमच्या बाहेर पाऊल टाकलेलं नाही.

श्वेता पुढे म्हणाली, लोकांनी सर्दी खोकला झाला. ते डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांना समजलं की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा कोणत्याही प्रकारचा विनोद नाही. इथे 8 हजार पेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा मला फक्त अँबुलन्सचा आवाज येतो. भारतातून अनेकजण माझी विचारपूस करत आहेत त्या सर्वांचे खूप आभार. श्रद्धानं मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो मी होळीला भारतात येण्याचा विचार केला होता. मी इथे माझ्या पतीसोबत राहते. मात्र रोज मला आई-वडीलांची आणि माझ्या देशाची आठवण रोज येते. अनेकदा वाटलं की जी मिळेल ती फ्लाइट पकडून भारतात यावं पण मी स्वतःला रोखलं. माझ्यामुळे हा व्हायरस कोणाला व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. मला अद्याप याची लागण झालेली नाही मात्र स्वतःसोबत इतरांचीही सुरक्षा तेवढीच महत्त्वाची आहे. सर्वांनी घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. होम क्वारंटाईनमध्ये मैत्रिणींसोबत झोपा काढतेय मलायका, Photoवर अर्जुनची खास कमेंट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात