कोलकाता, 22 एप्रिल : कोरोनाचं थैमान सुरू पश्चिम बंगालमध्ये मात्र दोन वेगवेगळ्या कारणांनी वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी पोलिसांवर केलेली तुफान दगडफेक आणि हाणामारीमुळे वातावरण तापलं आहे. देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनच्या नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच स्थानिकांनी लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर आल्यानं पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र बाचाबाचीचं वादात आणि हाणामारीत रुपांतर झालं. पोलिसांनी रस्त्यावर असणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक आणि लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण करण्यात आली आहे. किराणा माल घेत असताना ही गर्दी झाली आणि या गर्दीला सोशल डिस्टन्स राखण्यासाठी सांगण्यात आलं मात्र स्थानिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत हे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. आधी महिलांवर लाठीचार्ज केल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
#WATCH: Clash broke between Police and locals after they (Police) objected to the road being blocked by the locals. The locals were alleging improper distribution of ration material amid #CoronavirusLockdown in Baduria, North 24 Parganas. #WestBengal https://t.co/TnzIOM0Qhp pic.twitter.com/ffJRXKknr4
— ANI (@ANI) April 22, 2020
हे वाचा- 27 एप्रिलला ठरणार लॉकडाउनचा निर्णय? मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक स्थानिकांनी रस्त्या ब्लॉक केल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली. दरम्यान आज अलीगढमध्येही पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. दिलेली वेळ उलटून गेल्यानंतरही बाजार सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई कऱण्यास सुरुवात केल्यावर अलीगढमध्येही स्थानिक आणि पोलिसांमध्ये तुफान वाद आणि हाणामारी झाली. संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. नागरिकांना वारंवार लॉकडाऊनचे नियम पाळण्याचं आवाहन करूनही त्यांचं उल्लंघन होत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे आरोग्य सेवा, पोलीस, सरकारी कर्मचारी नागरिकांना सेवा मिळावी म्हणून आपला जीव धोक्यात घालून ड्युटी करत असल्याचं चित्र असताना अशा प्रकार पोलीस आणि स्थानिकांमध्ये होणारे वाद थांबायचं नाव घेत नाहीत हे फार खेदजन घटना आहे. हे वाचा- ‘तुम्ही घरी येणार ना?’, मृत्यूच्या काही तासांआधी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं वच न संपादन- क्रांती कानेटकर