COVID: राज्यात गेल्या 6 महिन्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद, कोरोनामुक्तीचं प्रमाण गेलं 90 टक्क्यांवर

COVID: राज्यात गेल्या 6 महिन्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद, कोरोनामुक्तीचं प्रमाण गेलं 90 टक्क्यांवर

राज्यात एकूण 15 लाख 10 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्य दर 2.62 एवढा आहे.

  • Share this:

मुंबई 31 ऑक्टोबर:  कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर महिना हा दिलासा देणारा ठरला. या महिन्यात कोरोनाचा वाढणारा आलेख कमी होत गेल्याने प्रशासनाला काहीशी उसंत मिळाली. शनिवारी (31ऑक्टोबर) राज्यात गेल्या 6 महिन्यातली सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली. आज 74 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43, 911वर गेला आहे. राज्यात आज 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं. राज्यात एकूण 15 लाख 10 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्य दर 2.62 एवढा आहे.

शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राज्यात 8,241 जणांनी कोरोनावर मात केली होती तर 6,190 नवे रुग्ण आढळून आले होते. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्याही वाढली. तर रुग्णांची एकूण संख्या ही 16, 80 हजारांच्या जवळ गेली आहे. राज्यात शुक्रवारी 127 जणांचा मृत्यू झाला होता.  राज्यात सध्या 1,25,418 जणांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई आणि पुण्यातही  कोरोना रुग्णांचा आलेख खाली येत आहे. मात्र सण-सुदीच्या काळात जास्त गर्दी झाली तर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते असा इशारा देण्यात आला आहे.

...तर विमान प्रवास बाजारात जाण्यापेक्षा सुरक्षित; कोरोना काळात माहिती उघड

दरम्यान, हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने ‘Aviation Public Health Initiative’ एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कोव्हिडसंबंधी सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं तर बाजारात सामान खरेदीला गेल्यामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक असून, तुलनेने विमान प्रवासात कोरोना संक्रमण होण्याचा धोका कमी आहे.

कसं शक्य आहे? संपूर्ण देशात 6 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही

कोविड-19 चे प्रोटोकॉल आणि फेसमास्क वापरणं, हात धुणं इ. नॉन-फार्मास्युटिकल पद्धतींनी घेतली जाणारी काळजी ही भयानक कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी किती महत्त्वाची आहे. हे सिद्ध करणं हा हार्वर्डच्या या अभ्यासाचा मूळचा हेतू होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 31, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या