जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कसं शक्य आहे? संपूर्ण देशात 6 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही

कसं शक्य आहे? संपूर्ण देशात 6 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही

कसं शक्य आहे? संपूर्ण देशात 6 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही

काही देश कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या, तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना या देशात मात्र कोरोनाचं एकही नवं प्रकरण नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

तैपई, 31 ऑक्टोबर : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे. काही देश कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. अशामध्ये एका देशात मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचं एकही नवं प्रकरण सापडलेलं नाही. या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता संपूर्ण जग हैराण झालं आहे. गेले सहा महिने एकही कोरोनाचं लोकल ट्रान्समिशन नसलेला देश म्हणजे तैवान (taiwan). युरोप, अमेरिका आणि भारतात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असताना तैवानमध्ये गेले 200 दिवस कोरोनाचं लोकल प्रकरण सापडलं नाही. तैवानमध्ये  21 जानेवारीला कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळलं. तैवानमध्ये शेवटचा कोरोनाचं लोकल रुग्ण 12 एप्रिलला सापडला होता. तैवानची लोकसंख्या जवळपास 2 कोटी 30 लाख आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार तैवानमध्ये आता कोरोनाची एकूण 553 प्रकरणं आहेत. त्यापैकी फक्त 55 लोक ट्रान्समिशनची आहेत. तर फक्त 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा -  कर्फ्यू लावल्यानंतर या देशाचं रुपच पालटलं; PHOTOS मध्ये दिसतेय भयाण शांतता! सीएनएन च्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होताच तैवान सावध झालं. तैवानने सुरुवातीलाच आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. तसंच देशांतर्गत प्रवासावरही लक्ष ठेवलं होतं. त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. क्वारंटाइनसाठी योग्य नियमिम बनवले. मास्क बंधनकारक केलं. ज्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वात आधी उद्रेक झाला. तिथून येणाऱ्या प्रत्येक विमानातील प्रवाशाची तैवानमध्ये तपासणी झाली.  त्यानंतर वुहानच्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. चीन, हाँगकाँग आणि मकाऊमधन येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. हे वाचा -  Coronavirus दुसऱ्या लाटेमुळे बदललं युरोपातलं वातावरण; फ्रायडे नाईटचे 28 फोटो 2003 साली सार्सच्या महासाथीतून तैवाननं धडा घेतला होता आणि अशी कोणती महासाथ आल्यास त्यासाठी तैवान तयारही होतं. त्यामुळेच तैवानला कोरोनाची परिस्थिती हाताळता आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात