मुंबई 30 मे: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. दररोज रुग्णांची आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचीही संख्या वाढत आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधित रुग्ण घरी सोडल्याचा दावा सरकारने केला होता. सरकारच्या त्या दाव्यावरच विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. केवळ आकडेवारी जास्त दाखविण्यासाठी रुग्णांना घरी सोडलं जात असून आपलं युद्ध कोरोनाशी आहे आकड्यांशी नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले, शुक्रवारी सरकारने 8381 रुग्ण घरी सोडल्याचा दावा केलाय तर 116 रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच रुग्णांचं घरी जाण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त असतानाच मृत्यूची संख्याही सगळ्यात जास्त आहे. रूग्ण बरे होताहेत हे दाखविण्याचा घाईत त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करा, ही पुन्हा विनंती! फडणवीसांनी या आधीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. सरकारने पॅकेज जाहीर करावं अशी मागणीही केली होती. तर राजकारण करू नका, पॅकेज जाहीर करण्यापेक्षा सरकारने काम करणं जास्त महत्त्वाचं आहे असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे दिलं होतं. आता हे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापरात सर्वात मोठी तफावत; भारताने WHO ला दिलं पत्र आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत सर्वाधिक नवीन प्रकरणाची आणि जास्तीत जास्त मृत्यूची संख्या नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात 7964 नवीन प्रकरणं तर 265 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 1,73,763 इतकी सकारात्मक प्रकरणं आहेत. या वाढत्या आकड्यांमुळे देशाता कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार, सरकारने वाढवला टॅक्स मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 82,370 आहे तर आतापर्यंत 4,971 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 47.40 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 62228 कोरोनाची नोंद झाली आहे. यापैकी 33133 सक्रिय प्रकरणे असून 26997 लोक बरे झाले आहेत.
त्याच वेळी, 2098 लोकांनी आपला जीव गमावला आहे. शनिवारी सकाळी दिल्लीतील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 17386 वर पोहोचली. यापैकी 9142 सक्रिय रुग्ण असून 7846 लोक बरे झाले. मृतांची संख्या 398 वर पोहोचली आहे.

)







