Home /News /pune /

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार, सरकारने वाढवला टॅक्स

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार, सरकारने वाढवला टॅक्स

लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पुणे 30 मे: कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती, लॉकडाऊनमुळे तळाला गेलेली अर्थव्यवस्था अशा स्थितीत राज्यावर प्रचंड आर्थिक ताण पडला आहे. ही परिस्थिती असल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी महागणार आहे. 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च वाढला आहे. त्यामुळे पैशाचं गणित कसं जुळवायचं याची चिंता सरकारला पडली आहे. हा टॅक्स वाढल्यामुळे महागाईसुद्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोलवर आधी 26% vat +RS  10 cess आता - 26 % vat + RS 12 cess डिझेल आधी  24 % vat + RS 1 cess आता 24 % vat + RS 3 cess राज्यात आणि सर्व देशातच मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. चार वेळा लॉकडाऊन वाढवल्यावर आता पाचव्यांदा लॉकडाऊन वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे सगळे मोठे आणि लहान उद्योग बंद आहेत. आता सरकारने काही उद्योगांना परवानगी दिली आहे. मात्र अनेक उद्योगांना मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. केईएममध्ये 'हाय-फ्लो-नेझल कॅनूला'चा तुटवडा, विरोधी पक्ष नेत्यानं घेतला हा निर्णय लॉकडाऊनमुळे राज्यातून लाखो मजुरांनी आपापल्या राज्यांमध्ये स्थलांतर केलं आहे. कोरोना व्हायरसची भीती लोकांच्या मनात असल्याने अजुनही व्यवहार पाहिजे तसे सुरू झालेले नाहीत. त्यातच आरोग्य व्यवस्थेवरचा सरकारचा खर्च वाढत आहे. या परिस्थितीमुळे सगळ्या योजनांना कात्री लागली आहे. फक्त अत्यावश्यक प्रकल्पच संथपणे पुढे जात आहेत. सगळ्या योजनांचा पैसा हा फक्त कोरोनाविरुद्ध वापरला जात असल्याने सरकारवर ताण पडतो आहे. अरुण गवळीला कोर्टाचा दणका, 5 दिवसांत कारागृहात हजर राहण्याचे आदेश कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासन चालविण्यासाठीचा दररोजचा खर्च अशा सगळ्या कामांसाठी लागणारा पैसा जमा करणं हे सरकारसमोरचं आव्हान असून पैशाचं चक्र पुन्हा कसं सुरू करायचं असं मोठं आव्हान सरकारसमोर निर्माण झालं आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Petrol Diesel hike

पुढील बातम्या