पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, एका जिल्ह्यात पुन्हा Lockdownची घोषणा

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, एका जिल्ह्यात पुन्हा Lockdownची घोषणा

'सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतो. मात्र काही भागात जास्त रुग्ण वाढत आहेत.'

  • Share this:

सांगली 20 जुलै: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा Lockdownची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या स्थितीवर विचार करण्यासाठी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. हा लॉकडाऊन केव्हापासून आणि किती दिवसांचा व कसा असेल ते जिल्हाधिकारी ठरवतील, लवकरच त्याची नियमावली आम्ही जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं.

या बैठकीत पोलीस, प्रशासन आणि व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन सज्ज आहे. कोविड सेंटर मधल्या रुग्णांच्या आहाराची दुरावस्था होत असल्याची तक्रार काही ठिकाणाहून येत आहे. याबाबत प्रशासनाला तात्काळ योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लॉकडाउन संदर्भातील सविस्तर माहिती दिली जाईल. योग्य नियमावली जाहीर केली जाईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्हाला हा सक्तीचा निर्णय घ्यावा लागला आहे. आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या स्वास्थ्यासाठी सर्वांनी कटाक्षाने नियम पाळावेत असं आवाहनही त्यांनी केलं.

पाटील पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतो. मात्र काही भागात जास्त रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे नाईलाजाने जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करत आहोत. आतापर्यंत केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेला नागरिकांनी सहकार्य केले आहे यापुढेही कराल ही अपेक्षा करतो असंही ते म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 20, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading