Home /News /videsh /

Good News: कोरोनावरच्या Oxfordच्या लशीचे परिणाम जाहीर, सर्वात मोठं यश

Good News: कोरोनावरच्या Oxfordच्या लशीचे परिणाम जाहीर, सर्वात मोठं यश

या चाचणीनंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून त्याच्या निकालांकडे सर्व जगाचं लक्ष असणार आहे.

    लंडन 20 जुलै: Oxford Universityने कोरोनावर शोधलेल्या लशीची मानवी चाचणी झाली होती. त्याचे परिणाम आज जाहीर करण्यात आले. ते परिणाम सकारात्मक असून शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यातली ही सर्वात मोठी घटना समजली जाते. ही पहिल्या टप्प्यातली चाचणी आहे. या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचं दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात याबाबतचा एक अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आले आहेत. ChAdOx1 nCoV-19 असं या औषधाला नाव देण्यात आलं आहे. 1,077 जणांना ही लस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. हे परिमाण सकारात्म असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अँडीबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची वाढ झाल्याचंही आढळून आलं आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होते. या चाचणीनंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून त्याच्या निकालांकडे सर्व जगाचं लक्ष असणार आहे. दरम्यान इतर काही औषधांच्या चाचण्यांचे परिणामही येत आहेत.  आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधांचं ट्रायल केलं जातं आहे. शिवाय लशींच्याही चाचणी सुरू आहेत. अशा यूकेतील एका औषध कंपनीने आता कोरोनाव्हायरसविरोधात प्रोटिनयुक्त असं औषध तयार केलं आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्याचा दावाही कंपनीने केली आहे. हे वाचा - Coronavirus साथीचा सर्वोच्च बिंदू आलाय का? AIIMS संचालकांची महत्त्वपूर्ण माहिती रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यूकेतील साइनरजेन कंपनीने (Synairgen Plc) एसएनजी001 (SNG001) हे एक औषध तयार केलं आहे. यामध्ये इंटरफेरॉन बिटा नावाचं प्रोटिन (interferon beta protein) आहे. जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं, तेव्हा शरीरात नैसर्गिकरित्या या प्रोटिनची निर्मिती होते. नेबुलाइझरच्या माध्यमातून हे प्रोटिन असलेलं एसएनजी001 फॉर्म्युलेशन कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसात टाकता येऊ शकतो, असं कंपनीने सांगितलं. साइनरजेन कंपनीने रुग्णालयात दाखल असलेल्या 100 पेक्षा अधिक रुग्णांवर या औषधाचं क्लिनिक ट्रायल घेतले आणि या ट्रायलचे परिणाम सकारात्मक आल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या