Home /News /mumbai /

मुंबईतील रस्त्यावर रात्री उशिरा फिरणं गुन्हा? 'त्या' प्रकरणात कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल

मुंबईतील रस्त्यावर रात्री उशिरा फिरणं गुन्हा? 'त्या' प्रकरणात कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ही घटना दक्षिण मुंबईतील आहे. 13 जून रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय सुमित कश्यप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुमित रस्त्यावर बसला होता आणि त्याने रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे

पुढे वाचा ...
    मुंबई 20 जून : मुंबई-दिल्ली सारख्या मोठ्या शहरांत रात्रंदिवस धावपळ सुरूच असते, असं म्हणतात. इथे रात्रीच्या कोणत्याही वेळी लोक रस्त्यावर दिसतात. मात्र अनेक वेळा रात्री उशिरा फिरणाऱ्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावं लागतं. अशाच एका प्रकरणात मुंबईच्या स्थानिक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रात्री उशिरा फिरणं आणि चेहरा लपवणं याबद्दलच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. तसंच न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवलेली निरीक्षणंही अत्यंत महत्त्वाची आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणं हा गुन्हा नाही, (Late Night Wandering on Street) असं न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबईत उड्डाणपुलावर सुरु होती बगळ्यांची शिकार, सयाजी शिंदेनी गाडी थांबवली अन्... काय आहे प्रकरण - ही घटना दक्षिण मुंबईतील आहे. 13 जून रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय सुमित कश्यप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुमित रस्त्यावर बसला होता आणि त्याने रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122-ब अंतर्गत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जेव्हा कोणी गुन्हा करण्याच्या उद्देशाने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान चेहरा झाकतं तेव्हा हे कलम लागू होतं. हे प्रकरण मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात पोहोचलं असता येथे पोलीस अपयशी ठरले. न्यायालयाने 16 जून रोजी निकाल देताना आरोपीची निर्दोष मुक्तता केली. हा आदेश देताना न्यायदंडाधिकारी नदीम पटेल म्हणाले, आरोपीला रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली. मुंबईसारख्या शहरात रात्री दीडची वेळ म्हणजे फार जास्त उशीर नसतो. यावेळी रस्त्यावर कोणीही उभा राहू शकतं. त्यामुळे गुन्हा करण्यासाठी चेहरा लपवण्यात आला होता, असं मानता येणार नाही. 'तुमची नवरी पळून जाणार आहे', धक्कादायक मेसेजमुळे तरुण भांबावला, आणि... पुढे, न्यायालयाने म्हटलं की, "रात्री 1.30 ची वेळ खूप उशिरा आहे, असं गृहीत धरलं तरी, कर्फ्यू लागू नसेल तर रस्त्यावर फिरणं हा गुन्हा नाही. मुंबईत रात्री कर्फ्यू नसल्याने हा व्यक्ती रस्त्यावर उभा राहिल्यास तो गुन्हा नाही." पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीने रुमालाने तोंड लपवल्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने हा युक्तिवाद नाकारला. न्यायालयाने म्हटलं की, “हा कोरोनाचा काळ आहे आणि लोक सुरक्षिततेसाठी मास्क घालतात. अनेकदा जवळ मास नसल्यास लोक रूमाल बांधतात. त्यामुळे जर आरोपीने रुमाल चेहऱ्यावर बांधला असेल तर त्याचा अर्थ त्याने आपली ओळख लपवली असा होत नाही. कोर्टात आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस कोणतेही ठोस कारण देऊ शकले नाहीत, त्यानंतर कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Court, Crime news, Mumbai case

    पुढील बातम्या