जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'तुमची नवरी पळून जाणार आहे', धक्कादायक मेसेजमुळे तरुण भांबावला, आणि...

'तुमची नवरी पळून जाणार आहे', धक्कादायक मेसेजमुळे तरुण भांबावला, आणि...

'तुमची नवरी पळून जाणार आहे', धक्कादायक मेसेजमुळे तरुण भांबावला, आणि...

एका तरुण जोडप्याचं नुकतंच मे महिन्यात लग्न ठरलं. नवरदेव आणि नवरी एकमेकांसोबत नुकतंच नव्याने बोलू लागतात आणि अनपेक्षित प्रकार समोर येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : एका तरुण जोडप्याचं नुकतंच मे महिन्यात लग्न ठरलं. नवरदेव आणि नवरी एकमेकांसोबत नुकतंच नव्याने बोलू लागतात. ते एकमेकांना ओळखू लागत असताना अचानक नवरा मुलाच्या इन्स्टाग्राम मेसेजवर एक धक्कादायक मेसेज येवून पडतो. या मेसेजमुळे हे लग्न धोक्यात येतं की काय? अशी भीती निर्माण होते. पण नवरी मुलगी आपली बाजू समजावून सांगते आणि मोठा अनर्थ टळतो. संबंधित घटना ही मुंबईतीलच आहे. पीडित तरुणी ही 23 वर्षांची आहे. तिच्या होणाऱ्या पतीला अचानक एका इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मेसेज येतो. या मेसेजमध्ये “तुमची नवरी पळून जाणार आहे. ती माझ्यासोबत बोलते. आम्ही एकमेकांना ओळखतो”, असं लिहिण्यात आलेलं होतं. विशेष म्हणजे पीडित तरुणीच्या नावानेच इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आलं होतं. त्याच अकाउंटच्या माध्यमातून नवरदेवाला मसेज पाठवण्यात आला होता. याशिवाय इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील अशाच प्रकारच्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. ( तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांना हलक्यात घेऊ नका! असा लावा अर्थ ) हा सगळा प्रकार तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीला सांगतो. खरंतर तरुणाला देखील आधी मोठा धक्का बसतो. आपण ज्या मुलीसोबत लग्न करणार आहोत तिच्याबाबत इतकी धक्कादायक माहिती कशी मिळू शकते या विचाराने तो गोंधळून जातो. त्यानंतर तो थेट पीडितेला याबाबत विचारतो. पीडितेला याबाबत माहिती मिळते तेव्हा ती तरुणापेक्षा जास्त विचारात पडते. कारण याबाबत तिला काहीच कल्पना नव्हती. आपल्याला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आल्याचं पीडितेनं तिच्या होणाऱ्या पतीला सांगितलं. संबंधित प्रकरण हे पीडितेच्या सासरच्या मंडळींपर्यंत देखील पोहोचतं. अखेर पीडितेचे कुटुंबीय तिला खमकी साथ देतात आणि ते पोलिसात जाण्याचा निर्णय घेतात. त्यानुसार पीडितेने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित प्रकार जाणून घेतला. त्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित मेसेज हे नेमकं कोणत्या डिव्हाईसमधून पाठवण्यात आले याची चौकशी सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात