'कोरोना'विरोधात लढ्यात शिवसैनिक पुढे सरसावले, संजय राऊतांनी केली घोषणा

'कोरोना'विरोधात लढ्यात शिवसैनिक पुढे सरसावले, संजय राऊतांनी केली घोषणा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून याबद्दल घोषणा केली आहे

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांसाठी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. तरीही देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाविरोधात या लढ्यात शिवसैनिक खारीचा वाट उचलणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून याबद्दल घोषणा केली आहे. 'सेनेचे सर्व खासदार,आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत' अशी माहिती राऊत यांनी दिली.

हेही वाचा -पिंपरी चिंचवडमधून दिलासादायक बातमी, पहिल्या तिन्ही रुग्णांनी 'कोरोना'ला हरवलं!

तसंच, 'कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू' असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्णं

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात 16 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात देशभरात 80 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत देशभरात 694 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा -या दोन तरुणांच्या कामाला सलाम! मुक्या प्राण्यांना दिला घासातला घास

तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आणखी 5 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता ही संख्या 130 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे.

संजय राऊतांच्या मुलीने शेअर केला 'संपादक बाबां'चा व्हिडिओ

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळेच घरात बसून आहेत. या दरम्यान, संजय राऊत यांची कन्या पुर्वशी राऊत हिने तिच्या वडिलांच एक अनोखं रुप जगासमोर आणलं होतं. पुर्वशीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर वडिलांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यात संजय राऊत चक्क पेटी वाजवताना दिसत आहे. 'सामना'चे संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून संजय राऊत केवळ फटकारे मारतात, असा एक गैरसमज आहे. ते रूक्ष असावे असे अनेकदा अनेकांनी म्हटलं आहे. पण ते तसे नाहीत. ते राजकारणापलीकडे वाचतात, ऐकतात आणि बोलतात. तो आजही सैगल , बेगम अख्तर , चंद्रू आत्मा ऐकतो. ऐकताना गुणगुणतो....ते गुणगुणणे मनापासून असते. तो मूडमध्ये असला की त्याची बोटे टेबलावर तालात थिरकतात. आज खूप वर्षांनी तो सक्तीने घरी होता. त्याचे रेग्युलर वाचन आणि लिखाण आटोपल्यावर त्याने त्याची लाडकी पेटी बाहेर काढली..ती स्वतः साफ केली आणि आजची आमची संध्याकाळ संगीतमय करून टाकली.' असं पुर्वशी हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

First published: March 27, 2020, 9:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या