पिंपरी चिंचवडमधून दिलासादायक बातमी, पहिल्या तिन्ही रुग्णांनी 'कोरोना'ला हरवलं!

पिंपरी चिंचवडमधून दिलासादायक बातमी, पहिल्या तिन्ही रुग्णांनी 'कोरोना'ला हरवलं!

आणखी दिलासादायक बाब म्हणजे मागील 6 दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये एकही नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली नाही.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 27 मार्च : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या 3 कोरोनाबाधितांची दुसरी कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तिघांनाही आज  डिस्चार्ज दिला जाणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित आढळलेल्या पहिल्या 3 रुग्णांना आज हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार आहे. सोमवारी या 3 कोरोनाबाधितांवर उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले होते.  त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. आज त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे.

हेही वाचा -VIDEO : ...म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं पाहा

11 मार्च रोजी दुबईहुन आलेल्या 3 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले होतं. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णलयात उपचार सुरू होते. मात्र,  इथून पुढचे 14 दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहण्याची सूचना तिघांनाही  देण्यात आली आहे. त्याच बरोबर इतर 28 जणांचेही रिपोर्टही निगेटिव्ह आढळून आले आहे.  तर मागील 6 दिवसात नवीन कोरोना बाधितांची नोंद नाही. उपचार सुरू असलेल्यांचीही प्रकृती स्थिर, असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

 हेही वाचा -देशात एका दिवसात 88 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 694 वर

आणखी दिलासादायक बाब म्हणजे मागील 6 दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये एकही  नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली  नाही. मात्र, पिंपरी शहरात सुमारे 1200 पेक्षा अधिक रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असून नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

First published: March 27, 2020, 8:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या