मुंबई, 04 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. आता मुंबईचं हृदयस्थान असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवाजी पार्क परिसरात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला आहे. 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. हेही वाचा - राज ठाकरेंकडून PM मोदींवर हल्लाबोल, भाषणावर केली कडाडून टीका या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच्या इतर हायरिस्क अतिसंशयित रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसंच त्या सर्व संशयित व्यक्तींचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. हेही वाचा - कोरोनाला हरवणारे खरे योद्धा, आईच्या मृत्यूचा फोन आला तरी धरती मातेसाठी लढली ज्या परिसरात ही व्यक्ती आढळली आहे, तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दिनकर अपार्टमेंटमध्ये ही व्यक्ती राहते. त्यामुळे इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसंच हा परिसर रेड घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 537 वर दरम्यान,महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये रात्रभरात 28 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर ठाण्यामध्ये कोरोनाचे 15 नवे रुग्ण समोर आले आहेत. अमरावतीमध्ये 1, पुण्यात 2 तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या 1 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.