मुंबई, 4 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केलं आहे. जनतेला नम्र विनंती आहे लॉकडाउनला गांभीर्याने घ्या. जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. लॉकडाऊन वाढवला गेला तर त्याचा परिणाम उद्योग धंद्यांना होईल,’ अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणावरही नाराजी व्यक्त केली आहे. ‘लोक घरातच आहेत तर दिवे पेटवतील. मात्र पंतप्रधानांच्या भाषणातून आशेचा किरण दिसायला पाहिजे होता. देशातील रुग्णांची स्थिती काय आहे, बाकी त्यांच्यावरील उपचारांची स्थिती काय आहे, गरिबांच्या अवस्था बिकट झाली आहे, याबाबत त्यांनी भाष्य करणं अपेक्षित होतं,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: - कर्मचाऱ्यांचे पगार 50 टक्क्यांवर आणलेत - मोठे आर्थिक संकट येणार शिस्त पाळले नाही तर - सरकार ही काही करु शकत नाही कारण हे गरजेच आहे - लॉकडाऊन मुळे लोकांना नोकरीची भीती आहे - जे शिस्त पाळत नाही त्यांच्यामुळे इतरांवर ही परिस्थिती येते - व्हॉट्सअॅप वर कोणीही काहीही औषध सांगतायेत … डॉक्टर मेहनत घेऊन काम करतायेत - डॉक्टर, महावितरण, शेतकरी, सरकार, पोलीस यांचे आभार - लोकांना गांभीर्य कळत नाही - वैद्यकीय यंत्रणा कशी राबवली जात आहे, बाधित किती आहे या बाबत सरकारने बोलले पाहिजे - असा प्रसंग कोणाच्यावर आला नव्हता - हे वातावरण कोणी पाहिले पण नव्हते - अशी शांतता 92-93 च्या दंगलीला पक्ष नव्हती - अमेरीकेत 30 लाख लोकांनी हत्यारं घेतली - भारतात ती परिस्थिती नाही - पोलिसांवर हात टाकले जातात - मर्कजच्या घटनेतील लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.