नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: गेले काही महिने देशात कोरोना रुग्णांचा आकडा (Corona Cases in India) कमी घटल्यानंतर आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अलीकडील काही दिवसांत दक्षिण भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pandemic) वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येनं मागील दोन महिन्यांच्या तुलनेत उच्चांक गाठला आहे. चालू आठवड्यात देशभरात एकूण 2.9 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 32 टक्कांनी अधिक (32 percent corona cases rise) आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona virus 3rd wave) तोंडावर देशाची चिंता वाढत आहे.
असं असलं तरी एकट्या केरळ राज्यात मागील आठवड्यात 1.9 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा देशात आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 65 टक्के एवढा आहे. मागील चोवीस तासांत देशात 42 हजार 909 रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या पाच राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 29,836 रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. यानंतर महाराष्ट्रात 4,666, आंध्र प्रदेशात 1,557, तामिळनाडूमध्ये 1,538 आणि कर्नाटकात कोरोनाचे 1,262 रुग्ण आढळली आहेत.
हेही वाचा-लहान मुलांची काळजी घ्या! मुंबईतील मानखुर्दमध्ये 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह
देशात नव्यानं आढळलेल्या जवळपास 43 हजार कोरोना रुग्णांपैकी 90.55 टक्के रुग्ण हे वरील पाच राज्यांतून समोर आली आहेत. ज्यामध्ये एकट्या केरळचा वाटा 69.53 टक्के इतका आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात 380 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर केरळात 75 जणांनी आपला प्राण गमावला आहे.
हेही वाचा-47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका
सध्या देशात कोरोना मुक्तीचा दर 97.51 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत देशातील एकूण 34,763 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 वर पोहोचली आहे. यासोबतच भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 324 एवढी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.