मुंबई, 30 ऑगस्ट: राज्यात कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. त्यातच सध्या राज्यात (Maharashtra Corona Virus) सक्रिय रुग्णांची (Active Patients) संख्या 52 हजार 844 इतकी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य रुग्णवाढीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच केंद्रानं (Central Government) राज्याला रात्रीच्या संचारबंदीची (Night Curfew) शिफारस केली आहे. त्यानंतर राज्यात काळजी घेण्याची गरज असल्याचं मत राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी व्यक्त केलं आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं राज्याला कोरोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली. यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच केंद्र सरकारनं केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही त्यांनी सांगितलं. अनिल परब यांना ईडीची नोटीस, भाजपची पहिली प्रतिक्रिया कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. राज्यातही सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळ राज्यात ओनम सणानंतर कोरोना रुग्णांचा आकडा वाढला. त्याचा प्रार्दुभाव पाहता केंद्रानं राज्याला रात्रीची संचारबंदीची सूचना केली. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही आपल्याला आपल्या अधिक काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातही सणांचे दिवस येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार केंद्र सरकारनं केलेल्या सूचनेची अंमलबजावणी करेल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.