Home /News /mumbai /

Corona रुग्णवाढीने वाढली चिंता; BMC कडून खासगी रुग्णालयांना अलर्ट, जम्बो कोविड सेंटरही सज्ज करणार

Corona रुग्णवाढीने वाढली चिंता; BMC कडून खासगी रुग्णालयांना अलर्ट, जम्बो कोविड सेंटरही सज्ज करणार

कोरोनाने वाढवली मुंबईकरांची चिंता; BMC कडून खासगी रुग्णालयांना अलर्ट, जम्बो कोविड सेंटरही सज्ज करणार

कोरोनाने वाढवली मुंबईकरांची चिंता; BMC कडून खासगी रुग्णालयांना अलर्ट, जम्बो कोविड सेंटरही सज्ज करणार

Coronavirus in Mumbai: मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत आहे.

मुंबई, 1 जून : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना (Coronavirus in Mumbai) बाधितांच्या संख्येत वाढ (Spike in Coronavirus cases) होताना दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वीच कोरोना रूग्णाचे वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेच्या यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयांना अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जम्बो कोविड सेंटरही सज्ज करण्याची तयारी केली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता बीएमसीकडून आता युध्दपातळीवर कोरोना टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे. मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर काही खास निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे नवे निर्देश मुंबईतील कोरोना टेस्टची संख्या वाढवणार 12 ते 18 वयोगटातील लसीकरण वाढवावे बुस्टर डोसची संख्या वाढवावी जम्बो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत मालाडचे जम्बो कोविड सेंटर प्राधान्यानं सज्ज होणार वॉर्ड वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात आपातकालिन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल मास्कबाबत टास्क फोर्स कडून निर्देश येईपर्यंत अद्याप कोणताही निर्णय नाही वाचा : कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुंबईत पुन्हा निर्बंध? पालकमंत्र्यांनी केलं मोठं विधान वॉर्डच्या प्रभारी सहाय्यक समितीने वॉर्ड वॉर रूम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे जेणेकरून ते कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांनी सुसज्ज ठेवा खाजगी रुग्णालयांनी सतर्कता बाळगली पाहिजे. येत्या काही दिवसांत हॉस्पिटलायझेशन वाढल्यास मालाड जम्बो प्राधान्याने सुरू करण्यात येईल. प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील कोविड परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे आणि आवश्यक तेथे ठोस हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. पालिका आयुक्त पावसाळ्यासाठी तयार आहेत. का हे पाहण्यासाठी जम्बो रुग्णालयांना भेट देतील जेणेकरून ते डी-वॉटरिंग पंप, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा यंत्रणा, हाऊस किपिंग, कॅटरिंग, पॅरामेडिकल आणि वैद्यकीय कर्मचारी, O2 उत्पादन संयंत्रे आणि औषधांसह पूर्णपणे सुसज्ज आहेत हे सुनिश्चित करण्यात येणार मुंबईतील गेल्या 10 दिवसांतील कोरोना रूग्णांची आकडेवारी 31 मे - रुग्ण - 506, मृत्यू-० 30 मे - रुग्ण - 318, मृत्यू-० 29 मे - रुग्ण - 375, मृत्यू-० 28 मे - रुग्ण - 330, मृत्यू-० 27 मे - रुग्ण - 352, मृत्यू-० 26 मे - रुग्ण - 350, मृत्यू -० 25 मे - रुग्ण - 218, मृत्यू 24 मे- रुग्ण - 218, मृत्यू -० 23 मे - रुग्ण - 150, मृत्यू -० 22 मे - रुग्ण - 234, मृत्यू -० 21 मे - रुग्ण - 198, मृत्यू-० मुंबईत 16 मे रोजी सर्वात कमी म्हणजे 74 रूग्णांची नोंद झाली होती
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Coronavirus, Mumbai

पुढील बातम्या