मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Coronavirus: मुंबईवरही Omicron चं सावट? परदेशातून धारावीत आलेल्या व्यक्तीचा Corona रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus: मुंबईवरही Omicron चं सावट? परदेशातून धारावीत आलेल्या व्यक्तीचा Corona रिपोर्ट पॉझिटिव्ह

Maharashtra Coronavirus omicron news updates: देशात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. कर्नाटक आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला आहे.

Maharashtra Coronavirus omicron news updates: देशात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. कर्नाटक आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला आहे.

Maharashtra Coronavirus omicron news updates: देशात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. कर्नाटक आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला आहे.

  • Published by:  Sunil Desale
तुषार रुपनवर, प्रतिनिधी मुंबई, 5 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron Variant) जगभरात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच महाराष्ट्रातील डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण (Omicron patient in Dombivli) आढळून आला आहे. डोंबिवलीनंतर आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, परदेशातून मुंबईतील धारावीत (Dharavi Mumbai) आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला असून तो अहवाल अद्याप आलेला नाहीये. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सध्या सुरु आहे. धारावीवर ओमायक्रॉन व्हेरिएंटचं सावट? पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथुन आलेला एक व्यक्ती धारावी येथे वास्तव्यास आहे. या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यावर त्याला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे की नाही याचा खुलासा होईल. मात्र, यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. वाचा : परदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या कोविड रिपोर्टमध्ये आढळला हा Corona variant डोंबिवलीतील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. वाचा : कोरोनाची लस न घेता दक्षिण आफ्रिका, दुबई व्हाया डोंबिवली, omicron positive रुग्णाची धक्कादायक माहिती झांबियातून पुण्यात आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट आला झांबिया देशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचा जनुकीय तपासणीचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. त्या तपासणीत तो रुग्ण ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असून, त्याला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेजवळील झांबिया देशातून 20 दिवसांपूर्वी हा व्यक्ती पुण्यात आला होता. झांबियामधून पुण्यात आलेल्या या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता व त्याला हलका तापही आला होता. त्यामुळे त्याची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तेव्हा तो कोरोनाबाधित आढळून आला. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची 30 नोव्हेंबरला ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचं ठरले, त्यासाठी त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यात तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
First published:

Tags: Coronavirus, Covid cases, Mumbai

पुढील बातम्या